भिलवडीत रविवारच्या बाजारात सोशल डीस्टंसचा उडाला फज्जा
भिलवडी / वार्ताहर
राज्यापुढे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची चिंता वाढली आसल्याने जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील व जिल्हाआधिकारी अभिजित चौधरी यांनी जिल्ह्यात कोरोना संसर्गचा प्रसार रोखण्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक गावातील गर्दीचे आठवडे बाजार बंद करण्याचे आदेश दिले आहेत. परंतु भिलवडीसह परिसरातील भाजी विक्रत्यांनी पालकमंत्री व जिल्हाआधिकारी यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवित भिलवडीत रविवारचा बाजार प्रचंड गर्दीने भरविला यामध्ये सपशेल सोशल डिस्टंटचा फज्जा उडाला असून अनेक ग्रामस्थांच्या कडे मास्कचा वापर नव्हता यामुळे या भागात कोरोना बाबत कोणीही गांभीर्याने घेईना असे चित्र दिसत आहे.
स्थानिक आपत्ती व्यवस्थापन ग्रामपंचायत प्रशासन आणि पोलिस ठाणे यांचेही या रविवारच्या बाजाराकडे दुर्लक्ष होत असलेले दिसत आहे. हाकेच्या अंतरावर ग्रामपंचायत व पोलिस ठाणे असून ही अश्या बाबीच्यांवर अटकाव का ? केला जात नाही असा सवाल पडतो आहे.