कडेगाव / प्रतिनिधी
केन ऍग्रो एनर्जी इं. लि. या साखर कारखान्याचे चार कर्मचारी व संचालक कोरोना पॉझिटिव्ह सापडले आहेत. सर्व कर्मचाऱ्यांची वैद्यकीय तपासणी सुरु आहे तसेच कारखाना व परिसर निर्जंतुकीरण करणेत येत आहे अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जयकर पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे
कोरोना महामारीच्या काळात कामगार कर्मचारी यांची योग्य ती काळजी प्रशासन घेत आहेत. अलीकडे ग्रामीण भागात कोरोना मोठ्या प्रमाणावर वाढतो आहे. कारखाना कर्मचारी व संचालक कोरोना पॉझिटिव्ह सापडले. इतर कर्मचारी व परिसरातील लोकांना त्रास होवू नये याकरिता कारखाना प्रशासन दक्षता घेत असून सर्व कामगारांची वैद्यकीय तपासणी करण्यात येणार आहे. याकामी सर्वांनी दक्षता घेवून सहकार्य करावे असे अवाहन डॉ. जयकर पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.








