कुंडल/वार्ताहर
प्रतिसरकारच्या चळवळीचे फिल्डमार्शल, क्रांतीअग्रणी डॉ. जी.डी. बापू लाड यांच्या 9 व्या पुण्यतिथी निमित्त कुंडल येथे विविध ठिकाणी त्यांना आदरांजली वाहण्यात आली.
क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड सहकारी साखर कारखाना, ग्रामपंचायत कुंडल, क्रांतीअग्रणी जी.डी. बापू लाड महाविद्यालय, प्रतिनिधी हायस्कूल, क्रांती इंटरनॅशनल पब्लिक स्कूल, क्रांती दुध संघ, क्रांती गारमेंट, गणेशवाडी, सत्येश्वर, बसवेश्वर पाणीपुरवठा संस्था,कुंडल विकास सोसायटी, व अन्य सर्व संस्थामध्ये स्वर्गिय क्रांतिअग्रणी जी. डी. बापूंना आदरांजली वाहण्यात आली.
यावेळी क्रांती उद्योग समुहाचे प्रमुख अरुण लाड म्हणाले की, स्वर्गीय बापूसाहेबांनी कष्टकरी, शेतकरी, कामगारवर्गाला केंद्रस्थानी ठेऊन काम केले होते. त्यांनी स्वातंत्र्यासाठी आपले आयुष्य खर्ची घातलेच परंतू स्वातंत्र्यानंतर ही सतत कष्टकरी, शेतकरी व कामगार वर्गाच्या उन्नतीसाठी झटत राहीले.
यावेळी जिल्हा बँकेचे संचालक महेंद्र लाड, सत्यविजय बँकेचे अध्यक्ष बाळासाहेब पवार,क्रांती दुध संघाचे अध्यक्ष किरण लाड , जि. प. गटनेते शरद लाड, पंचायत समिती उपसभापती अरुण पवार, सर्जेराव पवार, सरपंच प्रमिला पुजारी, उपसरपंच माणिक पवार आदी. उपस्थित होते.
Previous Articleमच्छीमारांच्या जाळ्यात केवळ ‘फिश मिल’चा भरणा
Next Article पाण्यात चाळण असल्याने ‘ते’ दोघे बुडाले








