म्हैसाळ येथे ग्रामीण पोलिसांची कारवाई, 38 हजारांच्या दारुसह पावणे तीन लाखांचा मुद्देमाल जप्त
प्रतिनिधी / मिरज
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात संचारबंदी आदेश लागू असल्याने दारु विक्रीवर बंदी आहे. त्यामुळे कर्नाटक सीमा भागातून मोठ्या प्रमाणात दारु आणली जात आहे. मिरज ग्रामीण पोलिसांनी तालुक्यातील म्हैसाळ येथे चेकपोस्ट लावून कर्नाटकातून दारु घेऊन आलेली चारचाकी कार पकडली.
या कारवाईमध्ये सुमारे 37 हजार, 792 रुपयांच्या दारुसाठ्यासह वाहतुकीसाठी आणलेली कार असा दोन लाख 83 हजार 792 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याबाबत अजित मरग्याफ्पा कट्टीकर (वय 22, रा. लक्ष्मीनगर, मालगांव) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.