प्रतिनिधी / सांगली
शिवसेना पक्षप्रमुख आणि महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना सांगली जिल्ह्याच्यावतीने विटा येथे आजपासून 150 थाळी मोफत शिवभोजन वाटप करण्याचे आयोजिले असल्याची माहिती जिल्हा प्रमुख संजय विभूते यांनी दिली.
उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्ताने शिवथाळी वाटप, त्याच बरोबर अपघातग्रस्त मुलीच्या उपचारासाठी शिवसेना खानापूर तालुका आणि सांगली जिल्ह्याच्यावतीने सतीश दादा निकम तालुका प्रमुख शहर प्रमुख राजू जाधव आणि जिल्हाप्रमुख संजय विभूते यांच्यावतीने रोख दहा हजार रुपये मदत म्हणून त्यांच्या कुटुंबीयांच्याकडे सुपूर्द करण्यात आली. विटा शहर शिवसेनेच्यावतीने ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांना फळे वाटप करण्यात आले. तसेच गोरगरिबांना धान्याचे किट अनेक ठिकाणी वाटप करण्यात आले. शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या अहवालानुसार संभाजी सामाजिक बांधिलकी जपत अनोखे उपक्रम घेण्यात आले. या कोरोनासारख्या महामारीमध्ये योद्धा म्हणून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री लढत आहेत.
आई जगदंबा त्यांना दीर्घायुष्य देवो आणि लवकरात लवकर ही महामारी नष्ट होऊ दे आणि सर्वसामान्य माणसाचे जीवन अस्ताव्यस्त झालेले आहे ते परत पूर्वपदावर येऊ दे अशी प्रार्थना करण्यात आली.
यावेळी तालुकाप्रमुख सतीश निकम, युवा सेना जिल्हा युवा अधिकारी मिलिंद कदम, शहर प्रमुख राजू जाधव, शिरीष शेटे, महेश शेंडे, संतोष महाडिक, प्रभाकर महाडिक आणि असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








