प्रतिनिधी / सांगली
जिल्हा काँग्रेसच्या वतीने पेट्रोल, डिझेल व गॅस दरवाढी संदर्भात केंद्र सरकारचा निषेध करत जिल्हा काँग्रेस कमिटी समोर दिनांक 6 फेब्रुवारी 2021 रोजी सकाळी 11 वाजता धरणे आंदोलन करण्यात आले.
यावेळी महाराष्ट्र राज्याचे कृषी व सहकार राज्यमंत्री विश्वजीत कदम यांच्या उपस्थितीत हे आंदोलन करण्यात आले. सांगली शहर जिल्हा काँग्रेस कमिटी चे अध्यक्ष पृथ्वीराज पाटील, वसंतदादा कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील, श्रीमती जयश्री पाटील, युवा नेते जितेश कदम महापालिकेचे विरोधी पक्षनेते उत्तम साखळकर युवक शहर काँग्रेसचे अध्यक्ष मंगेश चव्हाण नगरसेवक अभिजीत भोसले यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी, नगरसेवक आणि कार्यकर्ते उपस्थित होते.








