प्रतिनिधी / आटपाडी
आटपाडी तहसीलदार, तालुका कृषी अधिकारी यांच्या बदल्या झाल्या असून आटपाडी पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी पदावर नवीन अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे आटपाडी तालुक्यातील शासकीय कार्यालयामध्ये अधिकारी बदलांना वेग आल्याचे चित्र आहे. दरम्यान, तालुका कृषी अधिकारी राहुल जितकर यांच्या बदलीने कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाला भरती आल्याचे चित्र होते.
आटपाडी तहसीलदार सचिन लंगुटे यांची सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयाकडे बदली झाली आहे. तर तालुका कृषी अधिकारी राहुल जितकर यांची सातारा जिल्ह्यात बदली झाली आहे. आटपाडी तहसीलदारांच्या बदलीनंतर शिवसेना, आरपीआय व इतरांनी पेढे वाटून आनंद साजरा केला. हा प्रकार विस्मृतीत जाण्यापूर्वीच तालुका कृषी अधिकारी जितकर यांच्या बदलीचा ही अनोखा आनंद कृषी विभागातील अन्य अधिकारी व कर्मचारी यांच्या चेहऱ्यावर पाहायला मिळाला.
नूतन तहसीलदार म्हणून अद्याप कोणाचीही नियुक्ती झालेली नाही. तर तालुका कृषी अधिकारी पदी पोपट पाटील यांनी पदभार स्वीकारला आहे. यापूर्वी पाटील यांनी आटपाडीत काम केले होते. आटपाडी पंचायत समितीच्या गट विकास अधिकारी पदी एम.आर. भोसले यांची कणकवली येथून बदली झाली आहे. मागील काही महिन्यापासून गट विकास अधिकारी पद रिक्त असून शेळके यांच्याकडे येथील पदभार सोपवण्यात आला होता.
या प्रमुख कार्यालयातील अधिकारी बदल्यासह आटपाडी पोलीस ठाणे व व अन्य अधिकाऱ्यांच्या बदल्या बाबत चर्चा रंगल्या आहेत. तालुका कृषी अधिकारी राहुल जितकर यांच्या मुदतवाढीचा निर्णय पूर्णत्वाकडे येत असतानाच त्यांची बदली झाल्याने येथील अन्य अधिकारी व कर्मचारी सुखावला आहे. तालुका कृषी अधिकारी यांच्याबाबत यापूर्वी तक्रारी झाल्यापासून कार्यालयात देखील इतर सहकाऱ्यांना मिळणारी वागणूक चर्चेत होती.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








