प्रतिनिधी / सांगली
जिल्ह्यात कोरोनाचा हाहाकार सुरूच आहे. बुधवारी विक्रमी रूग्ण वाढले आहेत. नवे एक हजार 363 रूग्ण वाढले आहेत. जिल्ह्यात मृत्यूचे तांडव वाढतच चालले आहे जिल्ह्यात बुधवारी 39 जणांचा मृत्यू झाला आहे.महापालिका क्षेत्रात 266 तर ग्रामीण भागात तब्बल एक हजार 97 रूग्ण वाढले आहेत. उपचार सुरू असणारे 925 रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. उपचारात 12 हजार 444 रूग्ण आहेत.
महापालिका क्षेत्रात 266 रूग्ण वाढले.
महापालिका क्षेत्रात रूग्णसंख्या आता मोठ्याप्रमाणात वाढत चालली आहे. महापालिका क्षेत्रात नवीन 266 रूग्ण वाढले आहेत. सांगली, मिरज आणि कुपवाड शहरात दिवसेंदिवस ही रूग्णसंख्या वाढतच चालली आहे. सांगली शहरात 176 तर मिरज शहरात 90 रूग्ण वाढले आहेत. महापालिका क्षेत्रात आजअखेर 22 हजार 108 कोरोनाबाधित रूग्ण आढळून आले आहेत. त्यातील 73 टक्के रूग्ण बरे झाले आहेत. तर उपचारातील रूग्णसंख्येचा आकडा वाढतच चालला आहे.
ग्रामीण भागात 1097 रूग्ण वाढले
ग्रामीण भागात रूग्णसंख्येचा उद्रेक सुरू झाला आहे. जिल्हÎातील प्रत्येक तालुक्यात रूग्णसंख्या वाढतच चालली आहे. रूग्ण आटोक्यात येण्याची कोणतीही चित्र दिसून येत नाही. प्रत्येक तालुक्यात रूग्णसंख्या वाढतच चालली आहे. आटपाडी तालुक्यात 148 तर कडेगाव तालुक्यात 36 रूग्ण वाढले आहेत. खानापूर तालुक्यात 220 तर पलूस तालुक्यात 64 रूग्ण वाढले आहेत. तासगाव तालुक्यात 127 तर जत तालुक्यात 100 रूग्ण आढळून आले आहेत. कवठेमहांकाळ तालुक्यात 82, मिरज तालुक्यात 181 रूग्ण वाढले. शिराळा तालुक्यात 80 तर वाळवा तालुक्यात 59 रूग्ण वाढले आहेत.
39 जणांचे मृत्यू
जिल्ह्यात बुधवारी 39 जणांचे मृत्यू झाले आहेत. महापालिका क्षेत्रात तब्बल आठ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. सांगली शहरातील 4 आणि मिरज शहरातील चौघांचा मृत्यू झाला आहे. कडेगाव तालुक्यात एक आणि खानापूर तालुक्यात चौघा रूग्णांचा मृत्यू झाला आहे. पलूस तालुक्यात एक तर तासगाव तालुक्यात पाच रूग्णांचा मृत्यू झाला आहे. जत तालुक्यात चार तर कवठेमहांकाळ तालुक्यात तीन रूग्णांचा मृत्यू झाला आहे. मिरज तालुक्यात पाच तर वाळवा तालुक्यात आठ जणांचा मृत्यू झाला आहे.
तब्बल 925 रूग्णांची कोरोनावर मात
जिल्ह्यात कोरोनाचे उपचार सुरू असणारे 925 रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आजअखेर जिल्ह्यात 73 हजार 90 रूग्ण कोरोनाबाधित झाले आहेत. तर त्यातील 58 हजार 440 रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
आज लसीकरण होणार नाही
जिल्ह्यात लसीकरण करण्यासाठी लस उपलब्ध नसल्याने गुरूवारी कोणत्याही लसीकरण केंद्रावर लस दिली जाणार नसल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय साळुंखे आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलिंद पोरे यांनी दिली आहे. जिल्ह्यात आजअखेर पाच लाख 37 हजार 845 नागरिकांना लस देण्यात आली आहे. शासनाकडून लस प्राप्त झाल्यानंतरच लसीकरण केले जाणार आहे.
नवे रूग्ण 1363
उपचारात 12444
बरे झालेले 58440
एकूण 73090
मृत्यू 2206
बुधवारचे बाधित रूग्ण
तालुका रूग्ण
आटपाडी 148
कडेगाव 36
खानापूर 220
पलूस 64
तासगाव 127
जत 100
कवठेमहांकाळ 82
मिरज 181
शिराळा 80
वाळवा 59
सांगली शहर 176
मिरज शहर 90
एकूण 1363
आजचे लसीकरण 1764
एकूण लसीकरण 537845









