डिचोली, सांखळी,वाळपई मतदारसंघातील प्रमुख नेते उपस्थित
प्रतिनिधी /सांखळी
कॉग्रेसच्या म्हणण्यानुसार देशात महागाईचा भडका उडाला असून सर्वसामान्य नागरिकांचे जगणे कठीण झाले आहे, गँस, पेट्रोल, डिझेल, कडधान्य ,गरजू समान महाग झाले असून याचा फटका गोव्यातील जनतेला ही बसला असल्याचे मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांच्या निदर्शनास आणून देण्यासाठी शुक्रवारी
डिचोली व सत्तरी तालुक्मयातील सांखळी, ,डिचोली, वाळपई मतदारसंघातिल प्रमुख नेत्याच्या उपस्थितीत काँग्रेसतर्फे साखळी शहरात सरकारी प्राथमिक आरोग्य केंद्राकडून शिवाजी महाराज पुतळा ते बाजार मार्गे कदंबा बस स्थानक पर्यंत बैलगाडी रेली काढण्यात येणार आली ,महागाई विरोधात घोषणा दिल्या या वेळी गिरीश चोडणकर, वि भिके, युवा अध्यक्ष वरद म्हालदोळकर, दशरथ मांजरेकर, याच्या सह राज्य पातळीवरील नेते उपस्थित होत
तसेच साखळी मतदारसंघातील माजी आमदार प्रताप गावस,धर्मेंश सग्लानी, नीलकंठ गावस,प्रवीण ब्लेगन, नगराध्यक्ष राया पार्सेकर, राजेश सावळ, खेमलो सावंत, मंगलदास नाईक, रेणुका देसाई, महादेव खांडेकर, यांचीही उपस्थिती होती
पर्रीकरानी दिलेले आश्वासन प्रमोद सावंतने पाळले नाहीः चोडणकर
संपूर्ण देशात आणि गोव्यातील महागाई ने जनता त्रस्त झाली असून घ्यास सिलिंडरचे भाव गगनाला भिडले आहे, डिजल, पेट्रोल शंभरी गाठत आहे,तेव्हा कॉग्रेस प्रमाणेच तेल करात सूट देऊन जनतेसाठी पेट्रोल कमी दरात उपलब्ध करुन घ्या, जणें करून महागाई थोडी कमी होईल, तसेच माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी निवडणुक होण्यापूर्वी जनतेला आश्वासन दिले होते की गोव्यात 60 रुपयांच्या वर पेट्रोल चा भाव जाणार नाही, मात्र त्यांच्या घालून दिलेल्या रस्त्यावर चालणाऱया प्रमोद सावंत ला विसर पडला, पर्रीकर यांनी दिलेले आश्वासन मुख्यमंत्री पाळत नाही असे मत कॉग्रेस प्रदेश अध्यक्ष गिरीष चोडणकर यांनी या वेळी बोलताना सांगितले
नीलकंठ गावस हे शेतकऱयाच्या वेशात दिसले
सांखळी मतदारसंघात नेहमीच चर्चा गप्पा रंगणारे कॉग्रेस पक्षचे जेष्ट कार्यकर्ते नीलकंठ गावस यांनी या रॅलीत शेतकऱयाची वेशभूषा केली होती यावेळी त्यांनी शेतकऱयांना येणाऱया विविध समस्या सरकारच्या नजरे सामोरे आणून दिल्या, इतरही प्रमुख नेत्यांनी महागाई विरोधात आपले विचार व्यक्त केले ,स्वागत व सूत्रसंचालन खेमलो सावंत यांनी केले









