प्रतिनिधी / वास्को
सांकवाळ पंचायतीला पंचायत घर बांधण्यासाठी आनंद बोस कन्स्ट्रकशन या आस्थापनाकडून जवळपास 1600 चौ. मि. जमीन दान करण्यात आली आहे. या जमीनीची किंमत जवळपास 65 लाख रूपये आहे. बुधवारी संध्याकाळी आस्थापनाचे मालक आनंद बोस यांनी या जमीनीचे दस्तऐवज पंचायतमंत्री माविन गुदिन्हो यांच्याकडे सुपुर्द केले.
यावेळी जिल्हा पंचायत सदस्य ऍड. अनिता थोरात, सांकवाळचे सरपंच गिरीष पिल्ले, पंच गोविंद लमाणी, नंदीनी देसाई, इतर पंच व मान्यवर उपस्थित होते. पंचायतमंत्री माविन गुदिन्हो यांनी यावेळी बोलताना सरकार गोव्यात ठिकठिकाणी पंचाघर प्रकल्प उभारीत असून सांकवाळ ग्रामपंचायत क्षेत्रासाठीही पंचायत घर उभारण्याचा मार्ग आता मोकळा झालेला आहे. सांकवाळ पंचायत घरासाठी यापूर्वीही जमीन संपादीत करण्याचा प्रयत्न झाला होता. मात्र, आता आनंद बोस बिल्डर्सनी आपली जमीन पंचायत घर प्रकल्पासाठी दान केल्याने गोव्यातील उर्वरीत पंचायतीप्रमाणे सांकवाळ पंचायतीलाही सुसज्ज पंचायत घर लाभणार असल्याचे मंत्री गुदिन्हो यांनी सांगितले. औद्योगिक सामाजीक दायीत्वाच्या भावनेतून आनंद बिल्डर्स आस्थापनाने ही जमीन सांकवाळ पंचायतीला दा
न केल्याचे मंत्री गुदिन्हो यांनी सांगितले. आता ज्या ठिकाणी सांकवाळ पंचायत कार्यालय आहे. त्याच ठिकाणी ही जमीन आहे.









