मुंबई \ ऑनलाईन टीम
केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारानंतर देशाच्या सहकार खात्याची जबाबदारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा(Amit Shah) यांच्याकडे देण्यात आली आहे. शहांकडे सहकार खाते गेल्यामुळे महाराष्ट्रातील सहकारावर याचा परिणाम होईल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. परंतु, या निर्णयाचे शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी स्वागत केले आहे.
संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधताना ही प्रतिक्रिया व्यक्त केली. केंद्र सरकारने नवं मंत्रालय तयार केलं आहे. केंद्राला सहकाराला काही मदत करायची इच्छा असेल. सहकार हा राज्याचा विषय आहे. अमित शहांकडे नव्या खात्याची जबाबदारी गेल्याने घाबरण्याचं कारण नाही. त्यातून काही चांगलं होऊ शकतं. शहांना सहकाराचा अनुभव आहे. त्यामुळे त्यांच्या मनात काही चांगल्या गोष्टी असतील तर त्या अंमलात आणतील, असा विश्वास राऊत यांनी यावेळी व्यक्त केला.
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सहकारावर भाष्य केलं आहे. सहकाराबाबतचे कायदे राज्याच्या विधानसभेमध्ये केलेले आहेत. त्यात केंद्राला हस्तक्षेप करता येत नाही. त्यामुळे केंद्र सरकारच्या नव्याने निर्माण करण्यात आलेल्या सहकार खात्यामुळे महाराष्ट्रातील सहकार क्षेत्रावर गंडांतर येण्याच्या चर्चेत तथ्य नाही. याबाबत येणाऱ्या बातम्यांना देखील फारसा अर्थ नाही. सहकार हा विषय घटनेनुसार राज्य सरकारच्या अखत्यारीतला आहे, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








