क्रीडा प्रतिनिधी /मडगाव
कुडचडे येथील सर्वोदय हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी हल्लीच झालेल्या दुसऱया राष्ट्रीय स्क्वे मार्शल आर्ट आर्टिस्टीक अजिंक्यपद स्पर्धेत धवल यश संपादन केले. सर्वोदयचा सक्षम कुंकळय़ेंकरने या स्पर्धेत आपली जबरदस्त छाप पाडताना 14 वर्षांखालील मुलांच्या सब-ज्युनियर गटातील जेतेपद मिळविले. या स्पर्धेचे आयोजन स्क्वे असोसिएशन ऑफ कर्नाटक यांनी भारतीय स्क्वे महासंघाच्या अधिपत्याखाली व्हर्च्युअल पद्धतीने केले होते. सर्वोदय हायस्कूलच्या सांची प्रभू नास्नोडकरने 14 वर्षांखालील मुलींच्या गटात तिसरे स्थान मिळविले. सक्षम कुंकळय़ेंकर आणि सांची प्रभू नास्नोडकरच्या या कामगिरीचे शाळा प्रमुख मनीषा खडजी यांनी अभिनंदन केले आहे.









