वृत्त संस्था/ आग्रा
ऑस्ट्रेलियाच्या दौऱयात कसोटी मालिका जिंकणाऱया भारतीय सघातील नवोदित किकेटपटू टी. नटराजन, शार्दुल ठाकुर, शुभम गिल, वॉशिंग्टन सुंदर, नवदीप सैनी आणि मोहम्मद सिराज यांना शानदार कामगिरीबद्दल नव्या मोटार गाडय़ा देवून गौरवविण्यात आले. आता कुस्ती क्षेत्रात विजेत्या ठरणाऱया मल्लाला सुमारे दीड लाख रूपये किंमतीची म्हैस बक्षीसादाखल दिली जाणार आहे.
येथे होणाऱया महिलांच्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत सर्वोत्तम महिला मल्लाची निवड केली जाणार असून तिला या स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी होणाऱया बक्षीस वितरण समारंभावेळी काही स्थानिक क्रीडाप्रेमीनी बक्षीस म्हणून म्हैस देण्याचा निर्णय घेतला आहे. सदर माहिती डब्ल्यूएफआयचे प्रमुख ब्रीजभूषण शरण सिंग यांनी दिली. सर्वोत्तम मल्लाला ही म्हैस आपल्या घरी घेऊन जाण्याची इच्छा नसेल तर तिला रोख दीड लाख रूपये दिले जातील. महिलांच्या या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत हरियाणाची सोनम मलिक, मध्यप्रदेशची पुष्पा आणि हरियाणाची मनिषा सहभागी होत आहेत.









