ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं पहिलं महाअधिवेशन मुंबईत होत आहे. या अधिवेशनात राज ठाकरेंनी पक्षाच्या नवीन झेंडय़ाचे अनावरण केले. यावेळी पक्षाच्या नेत्यांना विविध अजेंडा देण्यात येणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर मनसेकडून शॅडो कॅबिनेटची स्थापना करणार असल्याची माहिती पक्षाचे नेते शिरीष सावंत यांनी दिली.
शिरीष सावंत म्हणाले, महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये मंत्र्याच्या कामावर करडी नजर ठेवण्याची ‘शॅडो कॅबिनेट’ बनवण्यात येणार आहे. मनसेच्या नेत्यांवर याची जबाबदारी असणार आहे. याबाबत प्रत्येक मंत्र्याच्या कारभारावर लक्ष ठेऊन त्याबाबतीत कुठेही गैरव्यवहार होत असतील तर त्याचा रिपोर्ट पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे सोपविण्यात येणार आहे.
दरम्यान, मनसेच्या शॅडो कॅबिनेटमध्ये कोणते नेते असणार आहेत याची घोषणा माजी आमदार नितीन सरदेसाई दुपारी तीन वाजता करणार आहेत.