पुणे / प्रतिनिधी :
भाजपची सुरुवात दोन खासदारपासून झाली आणि आज आम्ही सत्तेमध्ये जाऊन बसलो आहोत. परंतु सत्तेसाठी आम्ही आमची विचारधारा सोडली नाही. काँग्रेसमधील काही लोकांना भाजपची अवस्था पाण्याच्या बाहेरील फडफडणाऱया माशा सारखी झाली आहे, असे वाटत असले तरी अजून घोडे मैदान दूर नाही. त्यांच्याकडे आता सत्ता आल्यामुळे त्यांच्या चेहऱयावर टवटवी आली आहे. असे म्हणत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी महसुल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यावर रविवारी येथे निशाणा साधला.
पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांच्या वार्तालापाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रसाद कुलकर्णी, उपाध्यक्ष सुकृत मोकाशी आदी उपस्थित होते.
प्रविण दरेकर म्हणाले, सत्तेसाठी शिवसेनेने आपली विचारधारा सोडून वेगळी भूमिका घेतल्याने मूळ शिवसैनिक नाराज आहेत. महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये मंत्री मंडळ विस्तार, बंगले, ऑफिसेस, आणि खातेवाटपावरून अनेकांमध्ये नाराजी पाहण्यास मिळात आहे. परंतु आता त्यांच्याकडे सत्ता आहे, त्यामुळे त्यांनी खुर्चीच्या खेळात न रमता जनतेचे, शेतकऱयांचे प्रश्न सोडवण्याकडे लक्ष द्यावे. ज्यांच्यावर आरोप आहेत, त्यांनाच मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले आहे. मागील सरकारच्या कामांना स्थगिती न देता या सरकारने ती कामे आणखीन ताकदीने पुढे नेण्याची गरज आहे.
आता नवीन मित्र आले तर तपासून घेणार
इतक्मया वर्षाच्या जुन्या मित्र सत्तेसाठी अशा पद्धतीने दूर गेला आहे. त्यामुळे भविष्यात नवीन मित्र आमच्याकडे आले, त्यांना आम्हाला तपासून घ्यावे लागेल. असे सांगत मनसेला भाजप सोबत येण्याची नामी संधी आहे. शिवसेनेने सत्तेसाठी त्यांची मूळ विचारधारा सोडली आहे. त्याचाच फायदा आता मनसेने घेऊन आमच्या सोबत यावे. अशी ऑफर दरेकर यांनी मनसेला यावेळी दिली.









