केरी,पर्ये,गुळेली भागातील लॉकडाऊन आवाहनाला चांगला प्रतिसाद : गुळेली भागातील 35 जणांच्या चाचण्या निगेटिव्ह
वाळपई / प्रतिनिधी
सत्तरी तालुक्मयातील या गावांमध्ये कोरोना पॉझिटिव रुग्णांची संख्या सात वर पोहोचली आहे यामुळे सत्तरीत भीतीदायक वातावरण पसरले असून कॅरी परी गुळेली आदी ठिकाणी नागरिकांनी स्वतः टाळेबंदीचा घेतलेला निर्णय सार्थ ठरवीत आज नागरिकांनी त्याला चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिला. केरी भागांमध्ये पूर्णपणे टाळेबंदी लागू करण्यात आली होती .यामुळे भागातील सर्व आस्थापने दुकाने बँक बंद होत्या.
दरम्यान सात रुग्णांपैकी शिरोली दोन मोर्ले चार व गुळेली एक या रुग्णांचा यामध्ये समावेश आहे.
याबाबतची माहिती अशी की गेल्या चार दिवसापासून सत्तरी तालुक्मयामध्ये कोरोना रुग्ण आढळून आलेले आहेत. यामुळे खळबळ निर्माण झालेली आहे. चार दिवसांपूर्वी गुळेली व मोर्ले या दोन गावांमध्ये प्रत्येकी एक असे रुग्ण सापडले होते. त्यानंतर आरोग्य खात्यातर्फे सदर रुग्णांच्या कुटुंबीयांची चाचणी करण्यात आल्यानंतर मोर्ले येथील रुग्णांच्या कुटुंबीयांपैकी तीध पॉझिटिव रुग्ण आढळून आल्याचे स्पष्ट झालेले आहे. यामुळे सत्तरी तालुक्मयात आतापर्यंत रुग्णांची संख्या सात वर पोहोचली आहे..
मोर्ले येथे 45 तर शिरोली येथे 15 जणांची तपासणी.
दरम्यान मोर्ले याठिकाणी सापडल्यानंतर त्यांच्या कुटुंबियांची व सभोवताली नागरिकांची साखळी सामाजिक आरोग्य रुग्णालयातर्फे तपासणी करण्यात आली. त्याचप्रमाणे शिरोली येथील पंधरा जणांची तपासणी करण्यात आलेली आहे. यामुळे 60 जणांच्या तपासणीचा अहवाल अजूनही प्राप्त न झाल्यामुळे एकूण परिस्थिती संदर्भात काहीच बोलू शकत नसल्याची माहिती साखळी सामाजिक रुग्णालयाचे आरोग्य अधिकारी डॉ. उत्तम देसाई यांनी प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलताना स्पष्ट केले.
जे नागरिक पॉजिटिव रुग्णाच्या संपर्कात आले होते त्यांची तपासणी करण्यात आल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

मोर्ले येथील एकाच कुटुंबात तीन रुग्ण
दरम्यान यासंदर्भात मिळालेल्या अधिक माहितीनुसार मोर्ले या ठिकाणी पॉझिटिव्ह रुग्ण सापडला होता. त्याच कुटुंबातील अन्य तीन जणांना कोरोना रोगाची लागण झाल्याचे स्पष्ट झालेले आहे .यामुळे एकाच कुटुंबातील एकूण चार जणांचा समावेश आहे .तरीसुद्धा सदर भागातील एकूण 45 जणांची तपासणी करून नमुने चिकित्सेसाठी पाठविण्यात आलेले आहेत.
शिरोली भागातील 8 वर्षिय बालिका पोझीटिव्ह.
दरम्यान शिरवली याकेरी पंचायत क्षेत्रातील आठ वषीय बालिका पॉझिटिव असल्याची माहिती उपलब्ध झालेली आहे त्याचप्रमाणे याच गावातील आणखी एक 22 वषीय महिला पॉझिटिव्ह रुग्ण म्हणून आढळून आलेली आहे. यामुळे सदर भागातील एकूण पंधरा जणांची तपासणी करण्यात आली असून त्यांचा अहवाल अजूनही स्पष्ट झालेला नाही. दरम्यान याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार वटपौर्णिमेच्या दिवशी सदर बालिका गावातील सर्व घरांमध्ये फिरली होती. यामुळे शिरोली गावांमध्ये खळबळ निर्माण झालेली आहे. जोपर्यंत पंधरा जणांच्या तपासणीचा अहवाल प्राप्त होत नाही तोपर्यंत भागांमध्ये भितीदायक वातावरण राहणार असल्याचे समजते.
गुळेली येथील 35 जणांची तपासणी नकारात्मक
दरम्यान गुळेली याठिकाणी एक रूग्ण सापडल्यानंतर सदर भागातील एकूण 35 जणांची तपासणी करण्यात आली होती. त्याचा अहवाल प्राप्त झाला असून सर्व तपासण्या निगेटिव्ह झाल्याची माहिती आरोग्य खात्याच्या सूत्राकडून उपलब्ध झालेली आहे. यामुळे भागांमध्ये समाधानाचा सुस्कारा सोडण्यात आला असून गेल्या दोन दिवसापासून कडक टाळेबंदी करण्यात आल्यानंतर आज दिवसभर त्यामध्ये काही प्रमाणात शिथिलता आल्याचे पहावयास मिळाले.
केरी येथे कडकडीत बंद
दरम्यान रविवारी संध्याकाळी भागातील सामाजिक कार्यकर्ते पंचायतीचे पंच सरपंच जागरूक नागरिक यांनी स्वतःहून केरी भागांमध्ये चार दिवस टाळेबंदी करण्याचा निर्णय घेतला होता. त्या संदर्भात असे आवाहन याभागातील दुकानदार आस्थापने बँकांना करण्यात आल्यानंतर आज पासून सदर भागातील व्यवहार पूर्णपणे बंद झाल्याचे पहावयास मिळाले. नेहमीच गजबजणारा हा परिसर आज पूर्णपणे शांत असल्याचे पहावयास मिळाले .बेळगाव भागातून येणाऱया वाहनांना याठिकाणी थांबा देण्यात येत नव्हता. याभागातील फक्त एक दुकान वगळता इतर सर्व प्रकारची दुकाने अस्थापना बंद होती .त्यामुळे नागरिकांनी दिलेल्या सहकार्याबद्दल भागातील पंचायत व जागृत नागरिकांनी सर्व दुकानदार यांचे आभार व्यक्त केलेले आहे.









