आरक्षणाचा निर्णय होईपर्यंत शासकीय नोकरभरती रद्द करा
कागल / प्रतिनिधी
सकल मराठा समाज कागलच्या वतीने आंदोलन करण्यात आले. सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते बसस्थानकासमोरील छत्रपती श्री. शिवाजी महाराज यांच्या पुतळयासमोर जमा झाले. कार्यकर्त्यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे अशा घोषणा देत राज्यातील पोलीस आणि इतर शासकीय नोकरभरती रद्द करण्याची मागणी केली. अशा अशयाचे निवेदन तहसीलदार शिल्पा ठोकडे यांना देण्यात आले.
सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते तहसिल कार्यालयासमोर आले. याठिकाणीही कार्यकर्त्यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, आरक्षण आमच्या हक्काचे,एक मराठा लाख मराठा अशा. घोषणा देत परिसर दाणाणून सोडला. यावेळी भैय्या माने, पक्षप्रतोद नितीन दिंडे, विशाल पाटील, आनंदा पसारे , नितीन काळबर, नानासो बरकाळे, प्रकाश जाधव, दिपक मगर आदी उपस्थित होते.
निवेदनात म्हटले आहे की, गायकवाड आयोगाने मराठा समजाला शिक्षणात १३ आणि नोकरीत १२ टक्के आरक्षण दिले होते. काही संघटना मराठा आरक्षणाच्या विरोधात गेल्या. मराठा आरक्षनाची घटनात्मक वैद्यता तपासण्याची याचीका न्यायमूर्तीच्या खंडपिठाकडे वर्ग करताना मराठा आरक्षणाला जी स्थगती देण्यात आली. ही बाब अत्यंत दुर्दैवी आणि चिंताजनक आहे.
शासनाने या निर्णयाच्या विरोधात पुर्नयाचिका दाखल करून मराठा समाजाला न्याय द्यावा. आरक्षणाचा निर्णय लागेपर्यंत सर्व नोकरभरत्या बंद कराव्यात, विद्यार्थ्यांची संपूर्ण शैक्षणिक फी माफ करावी अशा मागण्या निवेदनातून करण्यात आल्या आहेत. यावेळी सचिन मोकाशी, शशिकांत भालबर, सतिश पोवार, सुशांत कालेकर, महेश मगर, अमित पाटील, संग्राम लाड, विक्रम चव्हाण, अरविंद लाड, आदिंसह सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Previous Articleकुंभी प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला
Next Article दापोलीत राष्ट्रवादीचे सभापती सेनेच्या वाटेवर









