ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
जम्मूतील भारतीय हवाई दलाच्या स्थानकावर झालेल्या दोन ड्रोन हल्ल्यानंतर भारताने संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासभेत हा मुद्दा उपस्थित केला. सामरिक आणि व्यावसायिक मालमत्तांविरूद्ध दहशतवादी कारवायांसाठी सशस्त्र ड्रोनचा वापर करणाऱ्यांना गांभीर्याने घेतला पाहिजे. भविष्यात हा एक मोठा धोका असल्याचे सिद्ध होऊ शकते, असे भारताने संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत सांगितले.
सामरिक आणि व्यावसायिक मालमत्तांविरूद्ध सशस्त्र ड्रोनचा वापर करणाऱ्यांवर लक्ष ठेवणे आवश्यक आहे. सीमेपलीकडून शस्त्रास्त्रांची तस्करी करण्यासाठी दहशतवादी ड्रोनचा वापर करताना आम्ही पाहिले आहेत. दहशतवादी कारवाया करण्यासाठी ड्रोनचा शस्त्रास्त्र म्हणून वापर होत असून, तो विषय गांभीर्याने घेतला गेला नाही, तर भविष्यात त्याला लगाम घालणे कठीण होईल.









