अनिल चौधरी यांचे प्रतिपादन : खानापुरात संगीत भजन स्पर्धेत मणतुर्गा येथील बाल शिवाजी मंडळ प्रथम : 22 संघांचा सहभाग
वार्ताहर /खानापूर
संत ज्ञानेश्वर माउलींना वयाच्या सोळाव्या वर्षी श्री ज्ञानेश्वरी हा सर्वश्रेष्ठ ग्रंथ लिहिला. त्यानंतर हरिपाठ व अनेक अभंगांची रचना करून भागवत धर्माचा पाया घातला. संत तुकारामांनी गाथा या ग्रंथाची निर्मिती करून भागवत धर्माच्या देवालयावर कळस चढविला. या व इतर संत मांदीयाळीच्या साहित्यामध्ये आम्हाला भारतीय संस्कृतीचे दर्शन घडते. संगीत भजन गायनातून लोकसंस्कृतीची जोपासना होत आहे, असे प्रतिपादन लोकमान्य मल्टीपर्पज सोसायटीचे संचालक अनिल चौधरी यांनी केले. खानापूर येथील श्री चौराशीदेवी कला मंचतर्फे आयोजित संगीत भजन स्पर्धेच्या उद्घाटन समारंभप्रसंगी ते बोलत होते. येथील लोकमान्य भवनमध्ये संपन्न झालेल्या या समारंभाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त मुख्याध्यापक एस. जी. शिंदे हेते. नागुर्डावाडा येथील प्रगतशील शेतकरी हभप पुन्नाप्पा बिर्जे यांनी श्रीफळ वाढवून भजन स्पर्धेचे उद्घाटन केले.
खानापूर तालुका श्री चौराशीदेवी संगीत कला मंच यांच्यावतीने आयोजित केलेल्या संगीत भजन स्पर्धेत तालुक्मयातील मणतुर्गा येथील श्री बाल शिवाजी संगीत भजन मंडळ प्रथम आला. दुसरा क्रमांक गोल्याळी येथील रवळनाथ संगीत भजनी मंडळाने पटकावला. या स्पर्धेची सुरुवात माजी आमदार दिगंबर पाटील, महालक्ष्मी ग्रुपचे अध्यक्ष विठ्ठल हलगेकर, नगरसेवक नारायण मयेकर, शिवसेना कर्नाटक राज्य उपाध्यक्ष के. पी. पाटील, ता. पं. माजी सदस्य बाळासाहेब शेलार आदींच्या हस्ते झाले
अतिथी म्हणून आबासाहेब दळवी, गर्लगुंजी ग्रा. पं. माजी सदस्य पांडुरंग सावंत, जि. पं. माजी सदस्य विलास बेळगावकर, पद्मश्री मनोहर पाटील, विवेक गिरी, ऍड. एच. एन. देसाई, पत्रकार प्रकाश देशपांडे, वासुदेव चौगुले, राजू कुंभार, प्रसन्ना कुलकर्णी, प्रकाश चव्हाण, सयाजी पाटील, कृष्णा कुंभार सिंगीनकोप, नारायण कापोलकर, महेश जळगेकर, राजू सिद्धाणी, भरमाणी पाटील, ज्ञानेश्वर सुतार, भरमाजी पाटील चन्नेवाडी, ओमाणी नाईक, सहदेव पाटील, अरुण गावडे, लक्ष्मण शिंगाडे, परशराम शिवणगेकर आदी होते. जि. पं. माजी सदस्य जयराम देसाई, गोपाळ पाटील, विशाल पाटील, मुरलीधर पाटील, भाजपाध्यक्ष संजय कुबल यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
स्पर्धेचे औचित्य साधून पं. गजानन कुलकर्णी (बंडू मास्तर), तबला आर्टिस्ट तसेच लोकमान्य सोसायटीचे संचालक प्रा. अनिल चौधरी यांचा सत्कार करण्यात आला. प्रमुख वक्ते या नात्याने बोलताना प्रल्हाद मादार यांनी भजन म्हणजे सुर आणि ताल याला महत्त्व देणारा भाग आहे. व्यक्तीच्या अंगात असणाऱया कलागुणांना संगीताच्या तालावर तसेच सुरांच्या सुमधूर आवाजात तसेच तबला व मिळणारी दाद याला अधिक महत्त्व आहे. भजनामुळे प्रत्येकाला आनंद व नामस्मरणाचा छंद मिळतो, असे भजनाचे महत्त्व विशद केले.
सूत्रसंचालन एम. व्ही. चोर्लेकर तर आभार विश्वास किरमिटे यांनी मानले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी दिगंबर मो. पाटील, नारायण राऊत, बाळासाहेब बेळगावकर, दीपक चोर्लेकर, सुराप्पा पाटील, भाऊ पाटील, आत्माराम सुतार, महादेव पाटील, लक्ष्मण देसाई यांनी परिश्रम घेतले. स्पर्धेचे परीक्षक म्हणून वामन वागुकर व महेश सडेकर यांनी काम पाहिले.
स्पर्धेतील विजेते खालीलप्रमाणे
- प्रथम क्रमांक : श्री बाल शिवाजी संगीत भजन मंडळ, मणतुर्गे
- द्वितीय क्रमांक : श्री रवळनाथ संगीत भजनी मंडळ, गोल्याळी
- तृतीय क्रमांक : श्री दीपा संगीत तबला वादन विद्यालय, कंग्राळी
- चौथा क्रमांक : श्री शिव-गणेश संगीत भजनी मंडळ, दारोळी
- पाचवा क्रमांक : श्री विठ्ठल रखुमाई भजनी मंडळ, कुप्पटगिरी
- सहावा क्रमांक : श्री धन्य ते माता-पिता संगीत भजनी मंडळ, बाकनूर
- सातवा क्रमांक : श्री हनुमान भजन मंडळ, हब्बनहट्टी
- आठवा क्रमांक : श्रीराम संगीत भजनी मंडळ, रामनगर
- नववा क्रमांक : श्री बाल हनुमान भजनी मंडळ जामगाव
स्पर्धेतील इतरही बक्षिसांचे मानकरी
- उत्कृष्ट गायन : विठ्ठल विष्णू गुरव, रवळनाथ भजनी मंडळ, गोल्याळी.
- उत्कृष्ट हार्मोनियम : बाळासाहेब बेळगावकर, श्री शिव-गणेश संगीत भजनी मंडळ,दारोळी.
- उत्कृष्ट तबला वादन : विनायक मुतगेकर, दीपा तबला वादन संगीत विद्यालय,कंग्राळी.









