सांगली/प्रतिनिधी
सांगलीतील संजय नगर येथील डॉक्टर लिमये रोड येथे मनपाने सुमारे दोन कोट रुपये खर्च करून याठिकाणी वन बीएचके च्या 55 खोल्या काढ ण्यात आलेले आहेत परंतु गोरगरिबांना या घरकुलाचे वाटप अजूनही केलं नाही यामुळे याठिकाणी दिवसा आणि रात्री मोठ्या प्रमाणात अवैध धंदे सुरू आहेत घरकुल दारूचा अड्डा बनला आहे.
याकडे महापालिका आणि पोलीस यंत्रणांचे दुर्लक्ष होत आहे या ठिकाणी असणाऱ्या प्लास्टिकच्या पाईपा गायब झाले आहेत. घरकुलाच्या समोरील बाजूस सांडपाणी साठून राहिल्याने डासांचे प्रमाण वाढले यामुळे परिसरात डेंग्यूची साथ उद्भवण्याची शक्यता आहे. या घरकुलाच्या खिडक्या आणि लाईट बसवणे बाकी आहे. लॉक डाऊनच्या काळात याठिकाणी वाचमेन होता कोरनामुळे त्याला कामावरून काढले आहे. मोठ्या प्रमाणात घरकुलाची दुरवस्था झाली आहे व अवैध धंदे सुरू आहेत. महापालिकेने त्वरित कारवाई करावी अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे.