वार्ताहर/ संगमेश्वर
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर आरवली ते बावनदी या अपघात प्रवणक्षेत्रात दोन ठिकाणी झालेल्या अपघातात तिघेजण जखमी झाले. संगमेश्वर तालुक्यात रविवार हा अपघात ठरला.
मनोज कुमार बन्सी हे कंटेनरमध्ये (क्रमांक एम एच 04 एफ डी 2710) बाबाजी शिवराम क्लिअरिंग व पॅरिअर प्रा. लि. या कंपनीचा न्हावाशेवा येथे माल भरुन गोव्याला निघाला होता. कंटेनर संगमेश्वरनजीकच्या नावडी येथील 12 नंबर मोरीच्या वळणावर आला असता समोरुन कार आल्याने कंटेनरला ब्रेक लावल्याने कंटेनर रस्त्यामध्ये उलटला. यामध्ये कंटेनरचे मोठे नुकसान झाले. या बाबत फिर्याद प्रताप माणिक वाकरे यांनी दिली.
दुसरा अपघात गोळवली येथे घडला. या अपघातात मोहन उत्तम सांळुखे, दिनेश ब्रिजलाल अहिरे (दोन्ही राहणार जळगाव) आणि उस्फाद आरीफ मेमन (रा. दापोली) हे तिघेजण जखमी झाले. अस्फाद मेमन हा इर्टिगा गाडी घेवून मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील गोळवली रस्त्याचा अंदाज न आल्याने मोटारसायकल गाडीला पाठीमागून धडक दिली. या अपघातात दुचाकी रस्त्याच्या बाजूला जावून आदळली. त्यामध्ये दुचाकीच्या मागे बसलेले दिनेश ब्रिजलाल अहिरे आणि चालक मोहन साळुंखे जखमी झाले. या अपघातात दोन्ही वाहनांचे नुकसान झाले असून अधिक तपास संगमेश्वर पोलीस करीत आहेत.









