नवी दिल्ली
श्रीराम प्रॉपर्टीज यांचा आयपीओ बुधवार 8 डिसेंबर रोजी खुला होणार असून याअंतर्गत समभागांचा भाव 113-118 रुपये इतका निश्चित करण्यात आल्याची माहिती आहे. सदरच्या आयपीओतून कंपनी 600 कोटी रुपये उभारणार आहे. 10 डिसेंबरला आयपीओ बंद होणार असून 250 कोटी रुपयांचे ताजे समभाग कंपनी सादर करणार आहे. आयपीओअंतर्गत आधी 800 कोटींचे उद्दिष्ट ठरले होते, पण आता ते मागे घेत 600 कोटी उभारण्याचे नवे उद्दिष्ट निश्चित केले आहे.









