ऑनलाईन टीम / जम्मू :
जम्मू काश्मीरची राजधानी श्रीनगरमध्ये दहशतवाद्यांनी पोलीस पथकावर शुक्रवारी हल्ला केला. या हल्ल्यात दोन पोलीस कर्मचारी शहीद झाले आहेत, तर एक कर्मचारी जखमी झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, श्रीनगरमधील नौगाव सेक्टरमध्ये दहशतवाद्यांकडून केलेल्या हल्यात दोन जवान शहीद झाले असून एक पोलीस कर्मचारी जखमी झाला आहे. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. सध्या संपूर्ण परिसर सील करण्यात आला आहे. पोलिसांवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी परिसरात सर्च ऑपरेशन सुरु करण्यात आले आहे.
या हल्ल्यात शहीद झालेले पोलीस कर्मचारी इश्फाक अहमद आणि फैयाज अहमद जम्मू-काश्मीर पोलीस आणि पोलिसांच्या आयआरपी बटालियन – 20 मध्ये तैनात होते. जखमी झालेला जवान मोहम्मद अशरफ यांच्यावर उपचार सुरू असून सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे.
दरम्यान या दहशतवादी हल्ल्यामागे जैश – ए – मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा हात असल्याची माहिती समोर येत आहे.









