प्रशांत धारगळकर यांना राष्ट्रपती पदक जाहीर
प्रतिनिधी/ पणजी
गोवा अग्निशामक दलातील अधिकारी श्रीकृष्ण रवींद्र पर्रीकर यांना स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते राष्ट्रपती अग्निसेवा पदकाने सन्मानीत करण्यात येणार आहे. तसेच पेडणे अग्निशामक दलाचे सहाय्यक अधिकारी प्रशांत धारगळकर यांना राष्ट्रपती अग्नि सेवा पदक जाहीर झाले आहे.
काम कुठलेही निष्ठापूर्वक केले पाहिजे, त्याचा मोबदला आपोआप मिळत असतो, असे मानणारे श्रीकृष्ण रवींद्र पर्रीकर यांनी महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केल्यानंतर 1996 मध्ये गोवा अग्निशामक दलात फायर फायटर म्हणून भरती झाले. त्यांच्या कामाची सरकारने दखल घेऊन अवघ्या चार वर्षातच म्हणजे 2010 साली त्यांना सहाय्यक अधिकारी पदावर बढती देण्यात आली.

सहाय्यक अधिकारी म्हणून त्यांनी राज्यातील विविध अग्निशामक दल केंद्रावर काम केले आहे. आपल्या कामात नियमितपणे काहीतरी चांगला वेगळेपणा असावा असे ध्येय बाळगून काम करणारे पर्रीकर यांनी नागपूर येथे विशेष प्रशिक्षण घेतले आहे. त्यानंतर 2014 साली त्यांना स्टेशन फायर अधिकारी म्हणून बढती मिळाली. अगनिशामक दलातील त्यांचे सेवाकाळात त्यांना त्यांच्या उत्कृष्ठ सेवेबद्दल अनेकवाळा प्रशिस्तीपत्रक देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला आहे. 2014 साली त्यांना मुख्यमंत्री पदक प्राप्त झाले आहे. 2017 साली त्यांना पुन्हा मुख्यमंत्री सेवा पदक बहाल करण्यात आले. आपल्या कतृत्वाने आणि मेहनतीने पर्रीकर शिखराची एकएक पायरी चडत होते. त्यांच्या कार्याची दखल केवळ राज्य सरकानेच नव्हे तर केंद्र सरकारने घेतली आणि 2021 साली त्यांना राष्ट्रपती सेवा पदक जाहीर झाले ते आज 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्याच्या हस्ते त्यांना प्रदान करण्यात येणार आहे.









