अक्कलकोट/ प्रतिनिधी
अक्कलकोट तालुक्यातील शेतकऱ्यांना कृषी विभागाने राज्य शासनाच्या मदतीने बि-बियाणे, खतांचे तत्काळ मोफत वाटप करण्यात यावे.
कोवीड-19 ने जगाचा पोशिंदा असलेला शेतकरी मोठ्या प्रमाणात अडचणीत सापडलेला आहे. सध्या शेतकरी अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत असून अशावेळी राज्य शासनाने मदतीकरिता पुढे येण्याची गरज आहे तालुक्यातील अनेक कृषी केंद्र व दुकानात बी बियाणे व खताचा अत्यंत तुटवडा आहे तरी सरसकट शेतकर्यां ना बि-बियाणे, खतांचे मोफत वाटप त्वरीत करावेत. यंदा पावसाळा चांगला असल्याचे चित्र आहे. अशावेळी शेतकर्याना न्याय देण्यात मागे न राहता बि-बियाणे, खतांचे मोफत देण्यासाठी त्वरीत कार्यवाही सुरु करण्यात यावी. अश्या मागणीचे निवेदन रिपाईच्या वतीने देण्यात आले.