-सात हजार कोटींच्या ठेवी -अध्यक्ष हसन मुश्रीफ यांची माहिती
प्रतिनिधी/कोल्हापूर
जिल्हा बँकेने शेतकरी हिताचे अनेक चांगले निर्णय घेतले आहेत. शेतकऱ्यांनीही बँकेवर विश्वास टाकल्याने सात हजार कोटी ठेवींचा टप्पा पार केला असून 147 कोटी रुपये ढोबळ नफा झालेला आहे. अशी माहिती चेअरमन हसन मुश्रीफ यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली. शेतकऱयांना जास्तीजास्त सवलतीच्या दरात सेवा देणारी देशात कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँक एकमेव आहे. असा दावा त्यांनी केला. आता आजपासून पाच लाखांपर्यंतचे पीककर्ज बिनव्याजी देण्यात येणार आहे. असेही त्यांनी सांगितले.
171 टक्के पीककर्ज वाटत
पीककर्ज वाटपात जिल्हा बँक सर्वात पुढे आहे. यंदा 1371 कोटी वाटपाचे ध्येय होते. मात्र 2 लाख 36 हजार 958 शेतकऱयांना 2347 कोटींचे वाटप करुन 171 टक्के उद्दीष्ठ गाठले आहे. असे सांगत मंत्री मुश्रीफ यांनी बँकेच्या विविध योजनांची माहिती दिली. ते म्हणाले, जे सभासद बँकेकडून कर्ज घेऊन परतफेड करतील आणि ऊस बिलाची शिल्लक रक्कम बचत खात्यावर ठेवतील त्यांना 1 टक्क रिबेट देण्यात येणार आहे. तर सभासद पातळीवर शंभर टक्के वसुल करणाऱया सेवा संस्थांना 1 टक्के रिबेट देण्यात येईल. पशुसंवर्धन अणि मत्स्य व्यवसायासाठी अन्य व्याज दराने खेळते भांडवल कर्ज म्हणुन देण्यात येणार आहे. महापुरातील व्याज भरपाई म्हणून 15 कोटी 82 लाख रुपये भरपाई सोसायटÎांना दिली आहे. अपात्र कर्जमाफीतील कर्जावरील व्याज आकारणी बंद केली असून त्यापोटी 11 कोटी 86 लाख रुपये शेतकऱयांचे व्याज बँकेने माफ केले आहे. पीककर्ज घेतलेल्या 41 शेतकऱयांचा विमा प्रस्ताव कंपनीकडे पाठवण्यात आला आहे. असे मुश्रीफ यांनी सांगितले. जिल्हा बँक ही शेतकऱयांची जे जे देता येईल ते देण्याचा संचालक मंडळाने प्रयत्न केला आहे. पुढील आर्थिक वर्षात शुन्य टक्के एनपीए करण्याचा मनोदय असून दहा हजार कोटींच्या ठेवीचे ध्येय असल्याचे मुश्रीफ यांनी सांगितले.









