सांगली / प्रतिनिधी
भारतीय शेतकरी कामगार पक्षाच्या २५ व २६ सप्टेंबर रोजी सांगोला येथे झालेल्या मध्यवर्ती समितीच्या बैठकीत राज्यातील सर्व जिल्हा व तालुका कार्यकारिणी बरखास्त करण्याचा निर्णय घेण्यात आला. पक्षातर्फे मध्यवर्ती समिती सदस्य भाई चंद्रशेखर नलावडे पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे.
नजिकच्या काळात जिल्हा मेळावे घेऊन पक्षातील नव्याने प्रवेश केलेल्या व येऊ घातलेल्या तरूण कार्यकर्त्यांना समाविष्ट करत नव्याने पक्षाची पुनर्बांधणी करण्याचा निर्णयही बैठकीत घेण्यात आला आहे. हा निर्णय पक्षाचे सरचिटणीस भाई जयंत पाटील यांनी अध्यक्षीय भाषणात जाहीर केला असल्याचे पत्रकात म्हटले आहे.
यावेळी मध्यवर्ती समितीचे नेते व पक्षाचे वरीष्ठ नेते आमदार बाळाराम पाटील, भाई धैर्यशील पाटील, भाई राजेंद्र कोरडे, भाई एस. व्ही जाधव, भाई चंद्रशेखर नलावडे पाटील, भाई राहुल पोकळे आणि पक्षाचे मध्यवर्ती सदस्य व असंख्य तरूण कार्यकर्ते उपस्थित होते.
Previous ArticleBharat Bandh : शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी केले ‘हे’ आवाहन
Next Article “देशाचा प्रत्येक नागरिक शेतकऱ्याबरोबर”








