आयटी-फायनान्स या क्षेत्रातील समभाग वधारलेत
वृत्तसंस्था/ मुंबई
मुंबई शेअर बाजारातील नवीन वर्ष 2020 ची सुरुवात तेजीच्या वातावरणात झाली आहे. पहिल्या दिवशी बुधवारी इन्फोसिस, एचडीएफसी आणि लार्सन ऍण्ड टुब्रो या कंपन्यांचे समभागांची विक्री झाल्याने सेन्सेक्स तेजीत राहिला होता.
दिवसभरातील व्यवहारात सेन्सेक्स 52.28 टक्क्यांनी वधारुन निर्देशांक 41,306.02 वर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजारातील निफ्टी 14.05 टक्क्यांनी वधारुन निर्देशांक 12,182.50 वर बंद झाला आहे. दिग्गज कंपन्यांमध्ये पॉवरग्रिडचे समभाग सर्वाधिक 2.76 टक्क्यांनी तेजीत राहिले होते. त्यापाठोपाठ एनटीपीसी, महिंद्रा ऍण्ड महिंद्रा, लार्सन ऍण्ड टुब्रो, हिंदुस्थान युनिलिव्हर, एचडीएफसी आणि इन्फोसिस यांचे समभाग वधारले आहेत. दुसऱया बाजूला टायटन कंपनीचे समभाग 2.76 टक्क्यांनी घसरले आाहेत. तर इंडसइंड बँक 1.72 आणि बजाज ऑटोचे समभाग 1.21 टक्क्यांनी घसरले आहेत.
अन्य घडामोडींचे संकेत
नव वर्षाची सुरुवात शेअर बाजारात अनेक नव आशा घेऊन सकारात्मकपणे सुरु झाले आहे. यात आंतरराष्ट्रीय घडामोडीसह देशातील आर्थिक घटनांचा समावेश येत्या काळात भारतीय बाजारातील व्यापारावर होणार असल्याचे दिसून येत असल्याचे तज्ञांचे मत आहे. तर डिसेंबर तिमाहीचे नफा कमाईचे आकडे आणि आगामी अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर शेअर बाजाराची वाटचाल येत्या काळात निश्चित होणार असल्याचे अनुमान अभ्यासकांनी यावेळी मांडले आहेत.
मुख्य क्षेत्रांची कामगिरी
नव वर्षात आयटी,एफएमसीजी आणि फार्मा या क्षेत्रातील समभाग ग्रीन वातावरणात राहिले होते. तर वाहन, धातू निर्मिती, फायनान्स या क्षेत्रात समाधानकारक कामगिरीची नोंद झाली आहे.







