तालुक्मयातील 404 जणांचा समावेश, नियमांचे पालन करण्याचे आवाहन
प्रतिनिधी / बेळगाव
कोरोना बाधितांचा आकडा वाढतच आहे. शुक्रवारीही जिल्हय़ामध्ये तब्बल 1120 कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामध्ये बेळगाव तालुक्मयातील 404 जणांचा समावेश आहे. लॉकडाऊन करुनही रुग्णसंख्या वाढत असल्याने आरोग्य व्यवस्थेवर त्याचा ताण पडताना दिसत आहे.
गेल्या काही दिवसांमध्ये हजारपेक्षाही अधिक रुग्ण दररोज आढळून येत आहेत. याचबरोबर मृत्यूचे प्रमाणही वाढले आहे. तेव्हा प्रत्येकाने काळजी घेणे गरजेचे आहे. पहिल्या लाटेपेक्षाही दुसऱया लाटेमध्ये रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. त्यामुळेच क्लोजडाऊननंतर लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. असे असले तरी रुग्ण वाढण्याचे प्रमाण वाढत असल्यामुळे आरोग्य विभागाकडून नागरिकांना वारंवार कोरोनाचे नियम पाळण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
गुरुवारी 1448 रुग्ण सापडले होते. त्यानंतर आता 1120 रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे दररोज हजारपेक्षा अधिक रुग्ण सापडत आहेत. त्यामुळे सरकारी व खासगी हॉस्पिटलमध्ये आता रुग्णांसाठी बेड्स उपलब्ध नाहीत. तसेच ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत आहे. या वाढत्या रुग्णसंख्येमुळे आरोग्य विभागावर अधिक ताण पडताना दिसत आहे. नागरिकांनी मास्क, सोशल डिस्टन्स आणि सॅनिटायझरचा वापर करावा, असे आवाहन करण्यात येत आहे. असे असताना जनता मात्र अजूनही गाफील आहे.
शुक्रवारी आदर्शनगर, अलारवाड, अनगोळ, अन्नपूर्णेश्वरीनगर-वडगाव, अंजनेयनगर, अशोकनगर, अयोध्यानगर, अनसुरकर गल्ली, बसव कॉलनी, बसवणकुडची, गुरुप्रसाद कॉलनी, गुड्सशेड रोड, हनुमाननगर, हिंडाल्को कॉलनी, हिंदवाडी, शिवबसवनगर, रामतीर्थनगर, शाहूनगर, ज्योतीनगर, कलमेश्वरनगर, कामत गल्ली, कणबर्गी, कपिलेश्वर रोड, नेहरुनगर, ओल्ड पी. बी. रोड, पाटील गल्ली, रामतीर्थनगर, रामदेव गल्ली, रुक्मिणीनगर, सदाशिवनगर, समर्थनगर, शहापूर, खडेबाजार, कोनवाळ गल्ली, कोतवाल गल्ली, कुमारस्वामी लेआऊट, लक्ष्मीनगर, मजगाव, महांतेशनगर, माळमारुती, नानावाडी, टिळकवाडी, सुभाषनगर, वैभवनगर, विद्यानगर, विनायकनगर, शास्त्राrनगर, शिवाजी कॉलनी, शिवशक्तीनगर, श्रीनगर, गांधीनगर, भाग्यनगर, देवांगनगर-वडगाव यासह इतर ठिकाणी पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत.
ग्रामीण भागातील काकती, आंबेवाडी, एटीएस-सांबरा, बी. के. कंग्राळी, बागेवाडी, देवलापूर, बंबरगा, निलजी, बेळगुंदी, बाळेनट्टी, हिंडलगा, बिजगर्णी, मोदगा, गंदिगवाड, गणेशपूर, गोकुळनगर-मुतगा, होनीयाळ, करडीगुद्दी, मच्छे, मारिहाळ, झाडशहापूर, पंतबाळेकुंद्री, येळ्ळूर, कडोली, रणकुंडये, कुद्रेमानी, सुळेभावी, मुचंडी आदी ठिकाणी पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. त्यांच्यावर वेगवेगळय़ा इस्पितळांमध्ये उपचार करण्यात येत आहेत. विविध ग्राम पंचायतींनी जनजागृती सुरू केली आहे तर काही गावांमध्ये स्वतःहूनच लॉकडाऊन करण्यात आले आहे.
कोरोनाने शुक्रवारी चौघांचा मृत्यू कोरोनाने शुक्रवारी चौघांचा बळी घेतला असून आता हा आकडा 382 वर पोहोचला आहे. सध्या 9,583 सक्रिय रुग्ण आहेत. त्यांच्यावर वेगवेगळय़ा इस्पितळांमध्ये उपचार करण्यात येत आहेत. शुक्रवारी 358 जण कोरोनामुक्त झाले असून त्यांना घरी पाठविण्यात आले आहे.









