प्रतिनिधी/ रत्नागिरी
तालुक्यातील शीळ बौद्धवाडी येथे किरकोळ वादातून तरूणाला मारहाण करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आह़े कुणाला वामन यादव (30, ऱा शीळ बौद्धवाडी) असे मारहाणीत जखमी झालेल्या तरूणाचे नाव आह़े या प्रकरणी शहर पोलिसांत 6 जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आह़े
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरूवारी रात्री 11 च्या सुमारास कुणाल यांच्या घरावर अज्ञाताने दगड मारल़ा यावेळी कुणाल हे दगड कुणी मारला, हे पाहण्यासाठी बाहेर आले होत़े यावेळी दगड कुणी मारला याविषयी ते बडबडत असताना संशयित आरोपी यांनी कुणाला यांच्या घरातू शिरून मारहाण, शिवीगाळ व दमदाटी केली, अशी तक्रार कुणाल यादव यांनी शहर पोलिसांत दिली. उमेश उदय कांबळे, अजित अनंत कांबळे, अमित उदय कांबळे, अमोल अनंत आयरे, राजेश केरू मोहिते व अनंत राया अहिरे (ऱा सर्व शीळ बौद्धवाडी) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत़









