प्रतिनिधी / म्हापसा :
विधानसभेत सामूहिक विरोधी गट म्हणून आम्ही स्थापनकेला होता त्या गटांच्या आधारे आम्ही काही गोष्टी हाती घेतल्या जेणेकरून आमच्या सरकारवर एक अंकुश ठेवण्यासाठी जीजी सरकारची धोरणे चुकीची आहे त्यावर लक्ष ठेवण्यासाठी मजबूत सामूहिक गट स्थापन केला आहे. आणि त्या गटाच्या माध्यमातून आपण आपला पाठिंबा शिवोली मतदार संघातील काँग्रेसचे उमेदवार संगीता सागर लुंगुडकर व सुचिता झिला पेडणेकर यांना दिला आहे. अशी माहिती शिवोलीचे आमदार विनोद पालयेकर यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
भरघोस मतांच्या आधारे दोन्ही उमेदवार निवडून येणार. सरपंच मिल्टन मार्कीस आहे, इतर पंच आहेत, या सर्वांच्या पाठिंब्याने आम्ही भरघोस आघाडी घेणार असल्याची माहिती आमदार विनोद पालयेकर यांनी दिली.
लिंगुडकर घराण्याची परंपरा कायम राहील- मिल्टन मार्कीस
वेर्ला काणकाचे सरपंच मिल्टन मार्कीस म्हणाले की, काँग्रेसची तिकीट संगीता व सुचिता यांना देण्यात आली आहे आणि आपले कर्तव्य आहे आपले पंचसदस्य सागर लिंगुडकर यांच्या पाठिशी राहणे. संगीता यापूर्वी पंच होत्या त्यांचे पती पंच आहे तसेच त्यांचे आई वडीलही पंच होते. सागर लिंगुडकरांचा सर्वत्र परिचय आहे. हणूजण आसगावचे सरपंचही त्यांना पाठिंबा देणार आहे त्यामुळे एक चांगला प्रतिनिधी लाभणार आहे. आपण जिल्हा पंचायत असताना 10 लाख मिळाले होते आज 10 कोटी पेक्षा जास्त मिळतात. गावात विविध कामे होमार आहे. आमचे जिल्हा पंचायत उपाध्यक्ष वासुदेव कोरगावकर होते त्यानीही उत्कृष्टरित्या सेवा बजावली आहे. जनतेने संगीता लिंगुडकरला यांना व सुचिता पेडणेकर यांना मोठय़ा आघाडीने विजयी करावे असे आवाहन केले.