- विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र
ऑनलाईन टीम / मुंबई :
अहमदनगर जिह्यातील पारनेर तालुक्मयाच्या तहसिलदार ज्योती देवरे यांनी केलेल्या आरोपाने खळबळ उडाली आहे. यासंदर्भात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून तातडीने हस्तक्षेप करून न्याय द्यावा अशी मागणी केली आहे.
- देवेंद्र फडणवीस म्हणाले….
अहमदनगर जिह्यातील पारनेरच्या तहसिलदार श्रीमती ज्योती देवरे यांनी 11 मिनिटांची एक ऑडियो क्लिप जारी करून अनेक गंभीर आरोप स्थानिक लोकप्रतिनिधीवर आणि वरिष्ठ अधिकाऱयांवर केले आहेत. लसीकरणावरून काही कर्मचाऱयांना पोलीस अधिकाऱयांच्या समोर मारहाण करणे, अश्लील शिवीगाळ केल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
महिला कर्मचाऱयांना मारण्यासाठी महिला पोलिसांना बोलाविण्यास सांगणं जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षकांपर्यंत प्रकरण नेल्यानंतर तहसिलदार ज्योती देवरे यांच्याच बदनामीचा प्रयत्न करणे, वरिष्ठ अधिकाऱयांकडूनही त्यांना धमक्मया प्राप्त होणे, कोरोना काळात नियमांचे पालन करण्याचा प्रयत्न करीत असताना त्यातही अडचणी उत्पन्न करणे आणि मग थेट मंत्र्यांकडे त्यांच्या बदलीची शिफारस करणे, यातून महिला अधिकाऱयांचे खच्चीकरण करणे, असे अनेक गंभीर आरोप त्यांनी केले आहेत.
तसेच ‘थेट दीपाली चव्हाण प्रकरणाचा उल्लेख करून मी सुद्धा तुझ्याकडे येतेय, हा त्यांचा ऑडिओमधील आवाज अंगावर शहारे आणणारा आहे. एक स्त्री अधिकारी आपले कर्तव्य पार पाडत असताना संपूर्ण यंत्रणाच तिचे मानसिक खच्चीकरण करीत असेल आणि परिणामी त्या महिला अधिकाऱयाला आत्महत्येचा इशारा द्यावा लागत असेल तर ही बाब अतिशय गंभीर आणि मनाला वेदना देणारी आहे. ‘खरे तर कोरोना काळात संपूर्ण यंत्रणा दबावात काम करीत असताना त्यांना आणखी नाहक त्रास होणार नाही, याची काळजी घेतली जाणे अतिशय आवश्यक आहे. माझी आपल्याला विनंती आहे की, आपण यात तत्काळ लक्ष घालून हस्तक्षेप करावा’, असे फडणवीस यांनी या पत्रात म्हटले आहे.
- ‘…हीच कळकळीची विनंती’
‘या महिला अधिकाऱयाला आपण स्वतः बोलावून घेऊन त्यांची तक्रार ऐकून घ्यावी आणि त्यांच्या व्यथा समजून घ्याव्यात आणि तत्काळ त्यावर तोडगा काढून त्या अधिकाऱयाला न्याय द्यावा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात एखाद्या महिला अधिकाऱयाची इतकी अवहेलना होऊ नये, हीच कळकळीची विनंती’, अशी विनंती फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.