वार्ताहर / एकसंबा :
राजमाता जिजाऊ व शहाजी राजांच्या संस्कारामुळे शिवाजी महाराज व त्यांच्या सोबत स्वराज्यासाठी मावळेही घडले. आज प्रत्येकाला वाटते शिवराय जन्माला यावेत. पण त्यासाठी घरात जिजाऊ व शहाजीराजे असणे आवश्यक आहे. जरी शिवाजी घडविता आला नाही तरी एखादा तानाजी तरी घडवा, असे प्रतिपादन वक्ते राजन वाले यांनी केले.
एकसंबा येथील मराठा मंडळ सांस्कृतिक भवनामध्ये आयोजित राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त जिजामाता महिला मंडळाच्या स्थापना कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते. शवानी शितोळे हिने स्वागतगीत गायिले. रोहिणी शिरगावे हिने स्वागत व प्रास्ताविक केले.
शिवाजीराव माने म्हणाले, घर घडविण्याचे काम स्त्राr करते तसेच समाज घडविण्यासाठीही ती सक्षम आहे. त्यासाठी त्यांच्या पाठीशी शिवबा पाहिजे. यासाठी आजच्या मुलांवर संस्काराची गरज आहे. आजचा काळ परिवर्तनाचा आहे. जिवाला जीव देणारे मावळे होते म्हणून स्वराज्य घडले. तसे आज जिवाला जीव देणारा मित्रपरिवार पाहिजे. त्यासाठी जिजाऊंचा, शिवाजी महाराजांचा व स्वामी विवेकानंदांचा एक तरी गुण आपण घेतला पाहिजे, असे त्यांनी सांगितले. शुभांगी शिंदे, सलोनी मडिवाळ, वैशाली देसाई व सुप्रिया देसाई यांनीही मनोगत व्यक्त केले.
राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त जिजामाता महिला मंडळातर्फे वेशभूषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये महिला गटात निता शिंदे प्रथम, अनिता पवार द्वितीय, ज्योती तिकुटे यांनी तृतीय क्रमांक पटकावला तर मुलींच्या गटात निकिता वरुटे प्रथम, स्नेहा चौगुले द्वितीय तर तनिष्का मोरे हिने तृतीय क्रमांक पटकावला. विजेत्यांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमप्रसंगी मंचावर बाळासाहेब पाटील, महादेव रायजाधव, संजू देसाई, तानाजी पवार, डॉ. आदित्य कुंभार यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. कोमल जाधव हिने सूत्रसंचालन केले. श्रद्धा पोतदार हिने आभार मानले.
मांजरीत जिजाऊ, विवेकानंद जयंती
मांजरी : येथे स्वाभिमानी मराठा युवा मंच व विविध ग्रुपच्यावतीने स्वामी विवेकानंद जयंती व राजमाता जिजाऊ यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. शिवाजी तरुण मंडळाच्या सभागृहात राजमाता जिजाऊंच्या प्रतिमेचे पूजन स्मृती दाभोळे हिने केले, तर स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन पृथ्वीराज पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन दिलीप पवार यांच्या हस्ते करण्यात आले, तर पोपट लामकाने यांनी श्रीफळ वाढवून कार्यक्रमास सुरुवात केली. पौरोहित्य गिरी महाराज यांनी केले. चंद्रसेन कदम यांनी प्रेरणामंत्र वाचन केले. यावेळी परसराम तोरसे, ज्ञानेश्वर श्रीपती पाटोळे, शशिकांत पाटोळे, दादासाहेब जाधव, रामचंद्र कदम, सुरेश मंगलेकर, शिवाजी पाटोळे यांच्यासह स्वाभिमानी मराठा युवा मंच, ठाकरे ग्रुप, छत्रपती ग्रुप, आदर्श युवक मंडळ, नरवीर तानाजी मंडळ आदी युवक मंडळांचे कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते. नितीन जाधव यांनी आभार मानले.
मांगूर येथे राजमाता जिजाऊ जयंती साजरी
कारदगा : मांगूर येथील साई उद्योग समूहाअंतर्गत जिजामाता महिला औद्योगिक सहकारी संघामार्फत राजमाता जिजाऊ जयंती मोठय़ा उत्साहात साजरी करण्यात आली. प्रारंभी संघाच्या संचालिका नम्रता जाधव व उपस्थितांच्या हस्ते जिजामातांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. तर साईनाथ बेकरीचे जनरल मॅनेजर निवासराव जाधव यांच्या हस्ते श्रीफळ वाढविण्यात आले.
समूह प्रमुख प्रदीपराव जाधव म्हणाले, साई उद्योग समूहामार्फत नेहमी सामाजिक बांधिलकीला महत्व दिले जाते. नम्रता जाधव म्हणाल्या, जिजामाता महिला संघामार्फत वर्षभरात विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात. चालू वषीही मोफत लेन्स करून मोतीबिंदू ऑपरेशन निदान शिबिराचे आयोजन केले होते. यावेळी आप्पासो पाटील, अशोक बोधले, माजी ग्राम पंचायत अध्यक्ष सुनील जळणे, सचिन बोधले यांच्यासह साई उद्योग समूहातील विविध संघ संस्थांचे पदाधिकारी, संचालक मंडळ, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.









