न्हावेली गावावर शोककळा
डिचोली/प्रतिनिधी
शिवसेना पक्षाचे राज्य सरचिटणीस न्हावेली साखळी येथील एक सक्रिय कार्यकर्ते मिलींद गावस यांचे काल रवि. दि. 9 जाने. रोजी सकाळी ह्रदयविकाराच्या तीव्र झटक्मयाने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर न्हावेली गावातच स्थानिक स्मशानभूमीत अंतिम संस्कार करण्यात आले.
मिलींद गावस हे सकाळी न्हावेली येथून साखळीत सकाळी बाजारात आले असता त्यांना चक्कर आली. लागलीच साखळी सामाजिक आरोग्य केंद्रात नेले असता त्यांची तीव्र ह्रदविकाराच्या झटक्मयाने प्राणज्योत मालावली. दुपारी त्यांचा मृतदेह न्हावेली येथील त्यांच्या निवासस्थानी आणण्यात आला असता अनेक राजकीय, सामाजिक, क्रिडा व इतर क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अंतिम दर्शन घेऊन श्रध्दांजली वाहिली.
अविवाहित असलेले मिलींद गावस हे सध्या शिवसेना पक्षात सक्रिय होते. सरचिटणीस पदाची धुळ सांभाळताना अनेक वेळा ते सरकारविरोधात विविध विषयांवर बेधडक भाष्य करीत होते. पूर्वी ते काँग्रेस पक्षात होते. या पक्षाचे साखळी मतदारसंघातील त्यांनी युवा अध्यक्षपदही भूषविले आहे. तर गेल्या 2017 च्या विधानसभा निवडणुकीत ते आप पक्षाच्या उमेदवारीवर साखळी मतदारसंघात निवडणूक रिंगणात उतरले होते. त्यानंतर त्यांनी शिवसेना पक्षात प्रवेश केला होता. व आपले राजकीय कार्य चालूच ठेवले होते. तसेच ते एक कंत्राटदारही होते.









