पुणे \ ऑनलाईन टीम
राम मंदिराच्या मुद्द्यावरुन भाजप युवा मोर्चाने शिवसेना भवनावर काढलेल्या मोर्चावेळी मोठा राडा झाला. काही शिवसैनिकांनी भाजप कार्यकर्त्यांसह महिला पदाधिकाऱ्यांनाही मारहाण केल्याचा आरोप भाजपकडून करण्यात येत आहे. यानंतर शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी शिवसेना भवनावर कुणीही आंदोलन करायचं नाही, असा इशारा भाजप कार्यकर्त्यांना काल दिला होता. त्यानंतर आता परिवहन मंत्री आणि शिवसेनेचे नेते अनिल परब यांनीही भाजपला योग्यवोळी उत्तर देऊ, असा इशारा भाजपला दिला आहे.
अनिल परब पुण्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. म्हणाले की, शिवसेना भवनासमोर जो राडा झाला. त्याचं उत्तर भाजपला योग्यवेळी उत्तर दिलं जाईल. तसेच शिवसेनेच्या वर्धापन दिनावषयी म्हणाले की, दरवर्षीप्रमाणे यंदाही शिवसेनेचा वर्धापन दिन होईल. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वर्धापन दिन साधेपणाने करण्यात येणार आहे, असं परब यांनी सांगितलं.
पुणे मेट्रोचं काम लवकरच पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती देत २२ जुलै पर्यंत सगळं काम पूर्ण होईल, असं अनिल परब यांनी यावेळी सांगितले
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








