प्रतिनिधी / कोल्हापूर
शिवसेना पक्षासोबत वेळोवेळी गद्दारी करणारे आणि पक्षातून यापुर्वीच हाकालपट्टी केलेल्यांना पक्षाच्या कार्यक्रमात उघडपणे सक्रीय सहभाग करुन घेणारे जिल्हाप्रमुख संजय पवार यांची पक्षातून हाकालपट्टी करावी, अशी मागणी शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे शहर कार्यकारीणीच्या पदाधिकाऱयांनी केली असल्याची माहिती शहरप्रमुख रविकिरण इंगवले यांनी पत्रकार परिषदेत दिली.
शहरप्रमुख इंगवले म्हणाले, विधानसभा निवडणुकीत धनुष्यबाण हाच उमेदवार समजून काम करण्याचे आदेश पक्षश्रेष्ठींनी दिले होते. मात्र स्वतःला कट्टर शिवसैनिक म्हणवणाऱयांनी आदेशाला हरताळ फासत उत्तर विधानसभा मतदार संघात काँग्रेसच्या उमेदवाराचा प्रचार केला. यादरम्यान काँग्रेस उमेदवाराच्या गळÎात गळे घातलेले त्यांचा प्रचार करणारी छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल झाली. यामुळे त्यांचा खरा चेहरा समोर आला. यासंदर्भातील अहवाल संपर्क प्रमुख अरुण दुधवाडकर आणि इतर वरिष्ठ नेत्यांना पाठविल्यानंतर दूर्गेश लिंग्रस आणि कमलाकर जगदाळे यांची पक्षातून हाकलपट्टी करण्यात आली. तरीही पवार त्यांना सदस्य नोंदणी कार्यक्रमात घेवून येतात यामधून त्यांची पक्षनिष्ठा स्पष्ट होते.
जिल्हाप्रमुख पदी निवड झाल्यापासून त्यांनी पक्ष वाढीसाठी प्रयत्न न करता केवळ स्वहीत पाहीले. माजी आमदार चंद्रदीप नरके यांच्या उमेदवारा विरोधात तानाजी आंग्रे यांना बंडखोरी करायला लावून शिवसेनाचा उमेदवार पराभूत केला. संपर्कनेते दिवाकर रावते, संपर्कप्रमुख अरुण दूधवाडकर यांच्याविरोधात घोषणाबाजी करत त्यांच्या अंगावर धावून जाण्याचा अशोभनिय प्रकार पवार यांच्यासह बगलबच्च्यांनी केला. महापालिकेचे माजी परिवहन सभापती नियाज खान यांच्या घरावर हल्ला केला. हे प्रकरण अंगलट येत असल्याचे लक्षात येताच दूसऱयाच्या खांद्यावर बंदूक ठेवली. पक्ष बळकट करण्यापेक्षा शहर कार्यकारिणीत ढवळाढवळ करण्यातच त्यांना समाधान मिळत असल्याच आरोप इंगवले यांनी केला.
मागील काही वर्षात मातोश्रीवर टिका होत असताना जिल्हाप्रमुख म्हणून त्यांनी कधीही टिकेस उत्तर देण्याची धमक दाखवली नाही. सर्वपक्षीय नेत्यांशी सलोख्याचे संबंध ठेवून वेळोवेळी स्वतःची पोळी भाजून घेतली. पक्षनिष्ठा, पक्षहित बाजूला ठेवून स्वःहीत जोपासणाऱया पवार यांची भुमिका पक्षासाठी घातक आहे. त्यामुळे त्यांची पक्षातून हाकलपट्टी करण्याची मागाणी शिवसेना शहर कार्यकारीणीमधून होत असल्याची माहिती शहरप्रमुख इंगवले यांनी दिली.
पत्रकार परिषदेला रवी चौगुले, दीपक गौड, अरुण सावंत, जयवंत हारुगले, रघुनाथ टिपुगडे, किशोर घाटगे, रणजीत जाधव, सुशील भांदिगरे, अमर क्षीरसागर, सुनील जाधव, अविनाश कामते, पियुष चव्हाण, चेतन शिंदे, विश्वदीप साळोखे आदींसह शिवसैनिक उपस्थित होते.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









