प्रतिनिधी/ बेळगाव
वगाळ वस्ती, सिंधूर, ता. जत येथील शिक्षिका शिवलीला सुभाष जाऊर यांचा शिक्षक भारती परिवार जि. सांगलीच्यावतीने सावित्री फातिमा आदर्श शिक्षिका पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.
रविवारी जत येथे झालेल्या कार्यक्रमात त्यांचा सत्कार करण्यात आला. आमदार विक्रमदादा सावंत, शिक्षण सभापती आशाताई पाटील, महिला व बालकल्याण सभापती सुनीता पवार, जि. पं. सदस्या स्नेहलताताई जाधव, जि. पं. सदस्य सरदार पाटील, जत नगरपालिका शिक्षण सभापती भूपेंद्र कांबळे, पंचायत समितीचे सभापती मनोज जगताप, उपसभापती विष्णू चव्हाण, गटशिक्षणाधिकारी आर. डी. शिंदे आदींच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला.
शिवलीला यांनी शिक्षण क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्यामुळे त्यांचा गौरव करण्यात आला आहे. सांगली जिल्हा शिक्षक भरती परिवाराच्यावतीने हा पुरस्कार देण्यात आला असून शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी शिवलीला यांनी केलेल्या प्रयत्नांची दखल घेऊन त्यांचा गौरव करण्यात आला आहे.









