वृत्तसंस्था /भोपाळ :
मध्यप्रदेशात मंत्रिमंडळ विस्तारात काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या ज्योतिरादित्य सिंधिया यांचा प्रभाव दिसून आला आहे. 28 मंत्र्यांच्या यादीत 11 मंत्री हे सिंधिया यांचे समर्थक आहेत. ही मंत्रिमंडळाची नव्हे तर जनसेवकांची स्थापना आहे. माझी प्रतिमा मलीन करू पाहणाऱया लोकांनी ‘टायगर अभी जिंदा है’ हे जाणून घ्यावे असे म्हणत सिंधिया यांनी काँग्रेसला लक्ष्य केले आहे.
मध्यप्रदेशच्या जनतेसाठी सिंधिया कुटुंब सदैव समर्पित राहिले आहे. कमलनाथ यांच्या 15 महिन्यांच्या शासनकाळात भ्रष्टाचाराने टोक गाठले होते. कमलनाथ सरकारच्या काण्घ्त राज्याला पूर्णपणे नुकसान पोहोचविण्याचा प्रयत्न होत राहिला. तर शिवराज सिंग चौहान यांच्या नेतृत्वात जनसेवकांचे पथक मध्यप्रदेशाला आघाडीवर नेण्यास समर्पित राहिल असा मला पूर्ण विश्वास असल्याचे उद्गार सिंधिया यांनी काढले आहेत.
100 दिवसांच्या कार्यकाळात शिवराज सिंग यांनी कोरोना संकटाचा चांगल्याप्रकारे सामना केला आहे. राज्याला शिवराज यांच्यासारखा जनसेवकच आवश्यक आहे. भाजप सरकारकडून मध्यप्रदेशचा वेगवान विकास होणार आहे. कोरोनासारख्या घातक आजाराचा त्रास मी भोगून आलो आहे, त्याच्यापासून स्वतःचा बचाव करा असे आवाहन सिंधिया यांनी केले आहे.
शिवराज यांनी उत्तर टाळले
मंत्रिमंडळ विस्ताराच्या एक दिवसापूर्वी विष पचविण्याचे उद्गार काढणाऱया शिवराज यांनी शपथविधीनंतर अत्यंत तोलूनमापून विधान पेले आहे. कॅबिनेटमध्ये 11 सिंधिया समर्थक असल्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला असता शिवराज यांनी हे सर्व भाजपचे कार्यकर्ते असल्याचे नमूद केले आहे.









