प्रतिनिधी/ बेळगाव
शिवबसवनगर येथे सोमवारी सकाळी डॉ. शिवबसव महास्वामी यांचा 131 वा जयंती महोत्सव कार्यक्रम पार पडला. प्रमुख पाहुणे म्हणून गदगचे डॉ. सिद्धराम महास्वामी उपस्थित होते. त्यांनी प्रारंभी ध्वजारोहण केले. तसेच डॉ. शिवबसव स्वामी यांच्या भावचित्राला पुष्पहार अर्पण केला.
याप्रसंगी नागनूर रुद्राक्षीमठाच्या सिद्धरामेश्वर शिक्षण संस्थेच्या नूतन कार्यालयाचे उद्घाटनही करण्यात आले. यावेळी स्वामींसह शिमोगा येथील मुरूघा मठाचे डॉ. मल्लिकार्जुन महास्वामी, डॉ. अल्लमप्रभू महास्वामी, श्री गुरुसिद्ध महास्वामी, मडिवाळचे श्री राजयोगेंद्र महास्वामी, गुरुबसव महास्वामी आदी उपस्थित होते.









