प्रतिनिधी /बेळगाव
शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे शुक्रवारी पहाटे छत्रपती शिवाजी उद्यान येथे तिथीनुसार शिवप्रतापदिन साजरा करण्यात आला. छत्रपतींनी अफझलखानाचा वध करून अन्याय करणाऱया जुलमी सुलतानाचा अंत केला. याची आठवण म्हणून प्रत्येकवषी शिवप्रतिष्ठानतर्फे शिवप्रताप दिन साजरा केला जातो.
जिल्हाप्रमुख किरण गावडे यांच्या हस्ते शिवमूर्तीला अभिषेक घालण्यात आला. उपस्थितांनी विधिवतपणे महाराजांच्या मूर्तीचे पूजन केले. तालुका कार्यवाह कल्लाप्पा पाटील म्हणाले, दहशतवाद कसा संपवायचा असतो हे छत्रपती शिवाजी महाराजांनी अफझलखानाच्या वधातून दाखवून दिले आहे. यातून बोध घेत आजच्या राजकारण्यांनी देशाला पोखरत असलेला दहशतवाद संपवावा, असे विचार व्यक्त केले.
जिल्हाप्रमुख किरण गावडे म्हणाले, सीडीएस बिपिन रावत यांचे देशाप्रतीचे कार्य मोठे होते. त्यांच्या अपघाती निधनाने देशाचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यांच्यासोबत वरिष्ठ 12 अधिकाऱयांचेदेखील निधन झाले. शिवप्रतिष्ठानतर्फे या सर्वांना श्रद्धांजली वाहिली जात असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी शहर प्रमुख अजित जाधव, शहर कार्यवाह विश्वनाथ पाटील, चंद्रशेखर चौगुले, अनंत चौगुले, प्रमोद चौगुले, गजानन पवार, किरण बडवाण्णाचे, अंकुश केसरकर, युवराज पाटील, नामदेव पिसे, विजय कुंटे, नितीन कुलकर्णी यांच्यासह शिवप्रतिष्ठानचे कार्यकर्ते उपस्थित होते.









