कोल्हापूर : बातमीत शिवछत्रपतीचा लोगो घ्यावा.
प्रतिनिधी / कोल्हापूर
शिवछत्रपती पुरस्कारासह अन्य क्रीडा पुरस्कारांसंदर्भातील नियमावली क्रीडा विभागाच्या https://sporta.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द केलेली आहे. ही नियमावली खेळाडू, प्रशिक्षक, क्रीडा संघटना आणि मार्गदर्शकांनी पाहणे अतंत्य गरजेचे आहे. नियमावलीबाबत काही सुचना किंवा तक्रारी करायच्या आहेत, विशिष्ट प्रकारचा अभिप्राय द्यायचा आहे, त्यांनी तो daysdesk140gmail.com किंवा desk14.dtsya-mh‡gov.in या मेलवर पाठवावा. येत्या 22 जानेवारी सुचना, तक्रारी स्वीकारल्या जातील, असे क्रीडा व युवक सेवा संचालनालयाने प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळवले आहे.
क्रीडाक्षेत्रात अनण्य साधारपण कामगिरी केलेल्यांना दरवर्षी शिवछत्रपती जीवन गौरव पुरस्कार, उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक, जिजामाता पुरस्कारांने सन्मानित केले जाते. तसेच शिवछत्रपती खेळाडू, साहसी, दिव्यांग खेळाडूंना पुरस्कार दिला जातो. येतात. हे सर्व पुरस्कार देण्यासंदर्भात शासनाने 24 जानेवारी 2020 ला एक नियमावली जाहीर केली आहे. या नियमावलीमध्ये सुधारणा करण्याचे शासनाने ठरवले आहे. सुधारणा कशा पद्धतीने करता येतील, हे जाणून घेण्यासाठी शासनाने नियमावली संकेतस्थळावर नुकतीच जाहीर केली आहे. संकेतस्थळांवर पुरस्कारांबाबतची इत्यंभूत माहिती जाहीर केली आहे. अधिक माहितीसाठी खेळाडू, प्रशिक्षक, क्रीडा संघटना आणि मार्गदर्शकांनी लवकरात लवकर जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी डॉ. चंद्रशेखर साखरे यांनी केले आहे.