शिरढोण / प्रतिनिधी
शिरढोन तालुका शिरोळ येथील स्मशानभूमी दुरुस्तीकरिता जिल्हा वार्षिक योजनेतून निधी मंजूर झाला होता. या निधीतून स्मशानभूमी दुरुस्तीचे काम निकृष्ट दर्जाचे झाले असून या कामाची चौकशी करून संबंधितावर कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन गटविकास अधिकारी पंचायत समिती शिरोळ यांना दिले आहे.
स्मशानभूमी दुरुस्तीकरिता जिल्हा परिषद सदस्य विजय भोजे यांच्या विशेष प्रयत्नातून जिल्हा वार्षिक योजना ग्रामपंचायत जनसुविधा पुरविणे अंतर्गत स्मशानभूमी दुरुस्तीकरिता पाच लाख रुपये मंजूर झाले पण प्रत्यक्षात जागेवर काम पाहिले असता पाच लाख रुपयांचे काम दिसून येत नाही. सर्वसाधारण प्रत्यक्षात स्मशानभूमी दुरुस्तीचे काम दोन लाखाच्या आसपास दिसत आहे. तरी सदरच्या स्मशानभूमी दुरुस्तीच्या कामाची चौकशी करून संबंधितावर कारवाई करण्यात यावी अन्यथा आम्हाला लोकशाही मार्गाने आंदोलन करावे लागेल असे निवेदनात म्हटले आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








