वार्ताहर / बांबवडे
शाहूवाडी तालुक्यात वाढती रुग्ण संख्या विचारात घेता कडक अंमलबजावणीसाठी तहसीलदार गुरु बिराजदार यांनी तालुक्याच्या प्रमुख ठिकाणे अचानक भेटी देऊन दुकाने उघडी असणाऱ्यांवर धडक कारवाई करत दुकानांना सील ठोकून ग्रामपंचायत समितीला यापुढे नियम न पाळणार्यांवर धडक कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले. तर विनाकारण फिरणाऱ्या वाहनधारकांवर त्यांची रॅपिड अँटीजन तपासणी करून कारवाई करण्याचे आदेश यावेळी पोलिस निरीक्षक विजय पाटील यांना देण्यात आले.
शाहूवाडी तालुक्यात कोरोनाविषाणूचे रुग्ण दिवसेंदिवस वाढतच आहेत त्याबरोबर मृत्यूची संख्यादेखील वाढत असून तालुक्यात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. नुकतेच सुपात्रे पैकी हनमंतवाडी येथे चार दिवसांपूर्वी सुमारे 200 नागरिकांची स्वॅब तपासनी करण्यात आली होती. त्यापैकी नव्याने 36 रुग्ण करुणा बाधित मिळून आले आहेत. याचा गांभीर्याने विचार करून तहसीलदार गुरु बिराजदार यांनी बांबवडे बाजार पेठबाजारपेठस अचानक भेट देऊन दुकाने उघडी असणाऱ्यांवर कारवाई करून सील करण्यात आले.
त्याबरोबर ग्रामपंचायत प्रशासनाला यापुढे कडक कारवाई करण्याचे आदेश देऊन कामात हलगर्जीपणा झाल्यास ग्रामपंचायत बरखास्त करण्याची सूचना यावेळी देण्यात आली. यावेळी पोलीस निरीक्षक विजय पाटील यांना विनाकरण फिरणाऱ्या वाहनावर कडक कारवाई करण्याचे आदेश देऊन रॅपिड एंटीजन टेस्ट करण्याचे आदेश दिले त्यानंतर मोठी रुग्ण संख्या असलेल्या सुपात्रे हनुमंतवाडी गावाला तहसीलदार बिराजदार यांनी भेट दिली. त्याच्यासोबत गटविकास अधिकारी अनिल घोलप तालुका वैद्यकीय अधिकारी एच आर निरंकारी व इतर आरोग्य विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.