बेंगळूर
चीनमधील बहुराष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक कंपनी शाओमी भारतात आता पेमेंटसह सोने तारण, कर्ज व विमा क्षेत्रात व्यवसाय सेवा देण्यासाठी सज्ज होणार आहे. शाओमीचे भारतीय संचालन प्रमुख मनू जैन यांनी ही माहिती दिली आहे. सदरच्या नव्या सेवांसाठी ऍक्सिस बँक, आयडीएफसी बँक, आदित्य बिर्ला फायनान्स, स्टॅशफिन, मनी व्यू, अर्ली सॅलरी आणि पेडिट विद्या यासारख्या संघटनांशी भागीदारी करणार आहे.









