बेळगाव
शहापूर येथील लोकमान्य श्रीराम मंदिरामध्ये श्रावण मासानिमित्त श्री ज्ञानेश्वरी माऊली सेवा मंडळाच्यावतीने दि. 4 ते 7 सप्टेंबर या दरम्यान ज्ञानेश्वरी पारायण सोहळय़ाचे आयोजन करण्यात आले होते. दररोज दुपारी 2 ते 3 या वेळेत राम नाम जप महिला मंडळाच्यावतीने करण्यात आला. त्यानंतर दुपारी 3 ते 5 या वेळेत हभप रमाकांत उंडाळे यांच्या अधि÷ानाखाली ज्ञानेश्वरीच्या 9, 12, 15 व्या अध्यायाचे वाचन करण्यात आले. सायंकाळी 5 ते 6 या वेळेत हभप शंकर महाराज राठोड यांचे प्रवचन झाले. रात्री 8 ते 10 या वेळेत वारकरी सांप्रदायिक भजन झाले.
दि. 7 रोजी सकाळी काल्याचे भजन, नगरप्रदक्षिणा करून महाप्रसादाने सांगता झाली. याप्रसंगी मराठा बँकेचे सदस्य शेखर हंडे, आदिनाथ लाटुकर, विकास शिंदे, शाम कुडूचकर, भजनी मंडळ अध्यक्ष हभप लक्ष्मण बन्नार, हभप लव महाराज नार्वेकर, कुश महाराज नार्वेकर, बाळू पाटील, चंदू बेळगावकर, हभप परशराम पाटील, हभप परशराम मिरजकर, बाळकृष्ण नार्वेकर, एस. जी. सदरे, संभाजी सरनोबत, मनोहर अंकले, सेवेकर हभप वैजनाथ उचुकर, मनोहर पादुकले, महिला मंडळाच्या शारदा भेकणे, राम नाम जप महिला मंडळाच्या सदस्या उपस्थित होत्या.









