प्रतिनिधी/बेळगाव
शहर महाराष्ट्र एकीकरण समिती व सोनार गल्ली, वडगाव येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्यावतीने रोगप्रतिकारशक्ती वाढविणाऱया होमिओपॅथिक गोळय़ांचे वितरण करण्यात आले. शहर समितीचे सरचिटणीस किरण गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली शहराच्या विविध भागात या गोळय़ा वितरित करण्यात येत आहेत. सोनार गल्ली मंडळाच्या कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊन नागरिकांना या गोळय़ा दिल्या.
रोगप्रतिकारशक्ती कमी असणाऱया नागरिकांना कोरोनाचा संसर्ग होत असल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढविणे गरजेचे आहे. त्यासाठी आर्सेनिक अल्बम-30 या होमिओपॅथिक गोळय़ा वितरित केल्या जात आहेत.
गोळय़ा वितारणावेळी मंडळाचे कार्यकर्ते विनोद पाटील, अमोल धामणेकर, संदीप धामणेकर, किरण पाटील, युवराज पाटील, गणेश सुतार, संतोष पाटील, प्रताप धामणेकर, यश सप्रे, विकास धामणेकर, लक्ष्मण धामणेकर, प्रसाद मुगबस्त, निंगाप्पा पाटील आदी उपस्थित होते.









