प्रतिनिधी/ बेळगाव
दुरुस्तीच्या कारणास्तव रविवार दि. 5 रोजी शहरातील विविध भागांमध्ये वीजपुरवठा खंडित केला जाणार आहे. सकाळी 10 ते दुपारी 3 यावेळेत वीजपुरवठा ठप्प राहणार असून याची नोंद नागरिकांनी घ्यावी, असे हेस्कॉमने कळविले आहे.
पाटील गल्ली, भांदूर गल्ली, ताशिलदार गल्ली, रविवार पेठ, अनंतशयन गल्ली, कुलकर्णी गल्ली, शेट्टी गल्ली, फुलबाग गल्ली, मठ गल्ली, कलमठ रोड, मध्यवर्ती बसस्थानक, चव्हाट गल्ली, दरबार गल्ली, जालगार गल्ली, कसई गल्ली, वन विभाग कार्यालय परिसर, कोतवाल गल्ली, खडेबाजार, माळी गल्ली, भेंडीबाजार, मेणसी गल्ली, भोई गल्ली, खंजर गल्ली, कलईगार गल्ली, कचेरी रोड, काकतीवेस, रिसालदार गल्ली, नार्वेकर गल्ली, गवळी गल्ली, खडक गल्ली, भडकल गल्ली, आझादनगर, ओल्ड गांधीनगर, दीपक गल्ली, संकम हॉटेल रोड, बागलकोट रोड, उज्ज्वलनगर, न्यू गांधीनगर, अमननगर, मारुतीनगर, बसवण कुडची, देवराज अर्स कॉलनी या परिसरात वीजपुरवठा ठप्प राहणार असल्याचे हेस्कॉमकडून कळविण्यात आले आहे.









