प्रतिनिधी/ सातारा
सातारा शहरातील ऐतिहासिक व वास्तुशास्त्राrयदृष्टय़ा वारसा असणाऱया जतन व संवर्धन करण्यासाठी नगरविकास विभागाने केलेल्या हेरिटेज नियमावली मंजूर केली आहे. ती 31 जानेवारी 2013 पासून अंमलात आली आहे. 27 मिळकतींचे पुन्हा हेरिटेज यादीत समावेश करण्यात आला आहे, अशी माहिती मुख्याधिकारी शंकर गोरे यांनी दिली.
शहरात असलेल्या ऐतिहासिक स्थळांचे जतन करण्याकरता नगरविकास विभागाच्या सुचनेनुसार त्यावेळीच्या मुख्याधिकाऱयांनी 149 मिळकतींच्या अनुषंगाने प्रारुप हेरिटेज यादीमध्ये 38 मिळकती समाविष्ट करुन त्याबाबतची सुचना प्रसिद्धी दि. 14 ऑगस्ट 2014 ला झाली होती. वगळलेल्या 111 मिळकतीपैकी 27 मिळकती पुनशः हेरिटेज यादीमध्ये समाविष्ट करण्याबाबत वारसास्थळ जतन समितीने सुचविले होते. त्या अनुषंगाने नियम क्र. 4 नुसार हेरिटेज समितीच्या अभिप्रायानंतर 27 मिळकती हेरिटेज यादीत समाविष्ट करण्यात येत आहेत. त्यामध्ये दत्त मंदिर, बाल मोहन मंदिर, शिव मंदिर, वाघाची नळी, जिल्हा परिषद सभापती निवास 3, तहसील कार्यालय, भूमी अभिलेख कार्यालय, तळय़ाजवळ पोलीस हेड क्वार्टर, जीम ऍण्ड गर्ल्स हेस्टेल, मोती तळे, पोस्ट ऑफिस, वॉटर फाऊटन, मारुती मंदिर, पीडब्ल्यूडी इंजिनीअर ऑफिस, जिल्हा परिषद अध्यक्ष बंगला, रिहॅबिलिटेशन ऑफिस, पी.डब्ल्यू.डी.सुपरिटेंड इंजिनिअर निवासस्थान, जिल्हा परिषद ऑफिस, रिमांड होम, गव्हमेंट रेस्ट हाऊस, डिस्ट्रीक जज, रेसिडेन्स ऑफ डिस्ट्रीक सुपरिडेंट ऑफ पोलीस, पाळणा घर, सैनिक स्कूल प्रिन्सिपॉल बंगला यांचा समावेश आहे, असे मुख्याधिकारी शंकर गोरे यांनी सांगितले.









