विशेष प्रतिनिधी/ देवरूख
लांजा-देवराई गावातील प्रकाश भोवड नामक युवकाच्या खूनप्रकरणी देवरूख पोलिसांनी दोघा संशयितांच्या मुसक्या आवळल्या. 12 मार्च रोजी भोवड यांचा आंबा घाटात बेवारस स्थितीत मृतदेह सापडला होता. घटनास्थळी कोणताही पुरावा नसताना आरोपींपर्यंत पोहोचायचे तरी कसे, हा प्रश्न होता. अखेर मृतदेहाच्या अंगावरील शर्टाचा लोगो कामी आला आणि देवरूख पोलिसांनी आरोपींचा शोध घेतला.
रूपेश दयानंद कोत्रे (लांजा-शेवरवाडी) व सतीश चंद्रकांत पालये (कोंडये-पालयेवाडी-लांजा) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. 12 मार्च 2020 रोजी अनोळखी इसमाचा मृतदेह आंबा घाटातील चक्रीवळणाजवळ सापडला होता. मृतेदहाची स्थिती पाहता त्यावेळी अज्ञातावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. यानंतर या खुनाचा तपास सुरू करण्यात आला. आंबा घाटातील मृतदेहामुळे याची माहिती सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणे, मुंबईत देण्यात आली तसेच कर्नाटक, विजापूर येथेही शोध घेण्यात आला. मात्र मृताची ओळख पटवण्यात अपयश आले. अखेर त्याच्या अंगावरील शर्टवर राज मुंबई असा लोगो सापडला. त्यावरून त्या टेलरचा शोध घेण्याचे काम सुरू झाले. या तपासासाठी समाजमाध्यमांचाही मोठय़ा प्रमाणात वापर करण्यात आला. पोलीस व्टीटरवरही याची माहिती प्रसिध्द करण्यात आली.
वरिष्ठांच्या मार्गदर्शनाप्रमाणे पोलीस निरीक्षक निशा जाधव, स.पो.नि. तुषार पाचपुते, शरद पवार यांनी जिल्हय़ातील रत्नागिरी व आजूबाजूच्या सर्व पोलीस ठाण्यामध्ये पोलीस पाटील यांची बैठक घेतली व मृताचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. याचवेळी कोणी बेपत्ता आहे का, याचीही माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले. याचवेळी मृताच्या अंगावर असणारा शर्ट हा लांजातील देवराई गावातील प्रकाश भोवड नामक युवकाचा असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक लांजा यांना मिळाली. त्याच माहितीच्या आधारे भोवड याच्या नातेवाईकांना बोलावून फ्ढाsटो दाखवला असता मृताची ओळख पटली. त्यानंतर पुढील तपासाची चक्रे फ्ढिरली. यातून 4 मार्च रोजी रात्री मृत प्रकाश आणि त्याचे दोन मित्र रूपेश कोत्रे, सतीश पालये यांची एकत्र जेवणाची पार्टी झाली. यात जातीवरून वादावादी झाली. त्याचा राग येऊन रूपेश कोत्रे याने प्रकाश याच्या डोक्यात लाकडी दांडक्याने फ्ढटका मारला व त्याला सतीश पालये याच्या सहाय्याने चारचाकी गाडीत घालून लांजा परिसरात फ्ढिरवले. तो मृत झाल्यावर त्याच्या प्रेतची विल्हेवाट लावण्यासाठी त्याचे प्रेत आंबा घाटातील चक्रीवळणाच्या दरीत टाकून दिले. या माहितीवरून यातील रूपेश दयानंद कोत्रे व सतीश चंद्रकांत पालये यांना अटक करण्यात आली. या दोघांनाही देवरूख न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता त्यांना 17 जुलैपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
यातील आरोपी रूपेश कोत्रे हा लांजा पोलीस ठाणे हद्दीतील अट्टल गुन्हेगार असून त्याच्यावर खुनाच्या गुन्हय़ासह 14 गंभीर गुन्हे दाखल आहेत. तो सध्या तडीपार आहे. त्याची लांजा पोलीस ठाणे हद्दीतील अनेक गावात दहशत आहे. हा खुनाचा प्रकार उघडकीस आणण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, अपर पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड, उपविभागीय पोलीस अधिकारी निवास सांळोखे यांच्या मार्गदर्शनाखाली देवरूख पोलीस निरीक्षक निशा जाधव, सहाय्यक पोलीस निरीक्षक तुषार पाचपुते, शरद पवार, चौधर यांच्यासह पो. हे. कॉ. भुजबळराव, पोना बरगाले, सडकर, तडवी, जोयशी, चालक पवार व इतर सहकाऱयांनी मेहनत घेतली. अधिक तपास पोलीस निरीक्षक निशा जाधव करीत आहेत.









