लवचिक शरीर पाहून लोक अवाप्
एका व्यक्तीचे लवचिक शरीर पाहून लोक अवाप् होत आहेत. शरीराच्या लवचिकतेमुळे हा व्यक्ती स्वतःच्या देशात अत्यंत लोकप्रिय आहे. पूर्ण जग फिरण्याचे त्याचे स्वप्न आहे. त्याचे लवचिक शरीर पाहून काही लोक त्याला ‘रबरा’चा माणूस म्हणत असतात. या व्यक्तीचे नाव जॉरेस कॉम्बिला असून तो पेशाने कंटोशनिस्ट आहे. जॉरेस स्वतःच्या शरीराच्या लवचिकतेमुळे सोशल मीडियावर चर्चेत आहे. आफ्रिकन देश गबोनचा तो नागरिक आहे.
मी माझ्या शरीराला अशाप्रकारे वाकवू आणि वळवू शकतो की ज्याची कुणी कल्पनाही करू शकत नाही असे जॉरेस सांगतो, परंतु यामुळे त्याला लोकांच्या टीकेलाही तोंड द्यावे लागते. परंतु लोकांच्या म्हणण्याकडे दुर्लक्ष करत तो स्वतःला योग्य वाटेल अशाप्रकारे जगत आहे.

कंटोर्शनची सुरुवात माझ्यासाठी सोपी नव्हती. लोक माझी चेष्टा करायचे. प्रारंभी त्रास देखील झाला, अनेकदा हे सर्व सोडून द्यावे असे वाटले. परंतु नातेवाईकांनी पाठिंबा दिला आणि ही कला सुरू ठेवण्याची सूचना केली होती. याच मेहनतीचे फळ म्हणून आता माझे देशवासीय मला अनेक टीव्ही वाहिन्यांवर पाहत आहेत. मी माझी उपजीविका कंटोर्शनच्या बळावर करत असल्याचे त्याने सांगितले आहे. जॉरेस टिकटॉक समवेत अनेक अन्य सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अत्यंत लोकप्रिय आहे. येथे त्याचे लाखो फॉलोअर्स आहेत, स्वतःच्या लोकप्रियतेसाठी तो सोशल मीडियाचे आभार मानतो.

सोशल मीडिया नसता तर मला इतकी लोकप्रियता मिळाली नसती. सोशल मीडियामुळेच माझी कमाई होत आहे. अनेकदा भागीदारीत अनेक कलाकारांसोबत देखील काम करतो. तसेच लोकांना लवचिक होण्यासाठीचे प्रशिक्षणही देत आहे. वयाच्या 7 व्या वर्षी मी स्पिलिट (पायांना 180 अंशाच्या कोनावर ठेवणे) करू इच्छित होते, मी हे करण्याचा प्रयत्न केला आणि यशस्वी ठरलो. यानंतर माझे शरीर अत्यंत लवचिक असल्याचे जाणवले, मग अनेक गोष्टींचा प्रयतन सुरू केला. माझ्या आईवडिलांना हा एखादा खेळ असल्याचे वाटायचे असे जॉरेस सांगतो.
जॉरेस स्वतः कंटोशनिस्ट आहे, कंटोशनिस्ट अत्यंत दुर्लभ पद्धतीची शारीरिक लवचिकता दर्शवितात. सर्कस, स्ट्रीट परफॉर्मन्स, एक्रोबेटिक्स, योग करणारे लोक अशा कृती करून दाखवत असतात.









